6 people killed in a horrific accident near Sangola solapur during kartiki pandharpur wari  
महाराष्ट्र बातम्या

Kartiki Wari: पंढरपूरला निघालेल्या दिंडीत कार घुसली, सात वारकऱ्यांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर: कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत सांगोला तालुक्यातील जुनोनी या गावात कार घुसल्याने सात जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकास समोर आला आहे. पंढरपूरकडे पायी निघालेले सहा वारकऱ्यांना एका वाहनाने चिरडले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी येथील काही भाविक कार्तिकी यात्रेसाठी पायी निघाले होते. जुनोनी गावाजवळ वाहनाने पाठीमागून धडक दिली. सामने दिलेल्या वृत्तानुसार, तब्बल १६ जणांना कारने चिरडलं आहे, ज्यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. सांगोला पोलिस घटना स्थळी पोचले आहेत.

दरम्यान या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांमध्ये पाच महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. तर धडक देणाऱ्या टाटा नेक्सॉन कारमधील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून कारमधील व्यक्ती या सांगोला तालुक्यातील सोनंद या गावातील रहिवासी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT