fraud sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूरच्या ६७ वर्षीय 'सीए'ला २.२८ कोटींचा गंडा! सायबर गुन्हेगारांनी शेअर मार्केटचे आमिष दाखविले, एक लाखास २५ हजाराचा परतावा लगेच दिला, नंतर...

सोलापूर शहरातील ६७ वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट (सीए) यांना एकेदिवशी व्हॉट्‌सॲपवर लिंक आली. त्या लिंकवर त्यांनी क्लिक केले. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवलेल्यांचे अनुभव त्याठिकाणी पाहायला मिळाले. त्यातून त्यांनी सुरवातीला एक लाख रुपये गुंतवले. सायबर गुन्हेगारांनी त्यांना चार-पाच दिवसांत २५ हजार रुपयांचा परतावा दिला.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरातील ६७ वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट (सीए) यांना एकेदिवशी व्हॉट्‌सॲपवर लिंक आली. त्या लिंकवर त्यांनी क्लिक केले. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवलेल्यांचे अनुभव त्याठिकाणी पाहायला मिळाले. त्यातून त्यांनी सुरवातीला एक लाख रुपये गुंतवले. सायबर गुन्हेगारांनी त्यांना चार-पाच दिवसांत २५ हजार रुपयांचा परतावा दिला. त्यानंतर ‘सीए’नी दीड महिन्यात दोन कोटी २८ लाख रुपये गुंतवले, पण त्यांना एक रुपयाही परत मिळाला नाही.

श्रीगोंदे नामक ‘सीए’ची सायबर गुन्हेगारांनी फसवणूक केली आहे. त्यांच्या ऑनलाइन फिर्यादीवरून सायबर गुन्हेगारांवर गुन्हा दाखल झाला आहे. ‘सीए’नी गुंतवलेली रक्कम एकूण सात खात्यात वर्ग केली होती. त्यातील तीन खात्यांची माहिती सोलापूर शहर सायबर पोलिसांनी मिळविली आहे. पुणे, राजस्थान व अकोला येथील ती खाती आहेत. दरम्यान, सायबर गुन्हेगारांनी विश्वास पटवा म्हणून श्रीगोंदे यांना एक लाख रुपयाला २५ हजार रुपयांचा परतावा दिला होता. विश्वास पटल्याने त्यांनी सायबर गुन्हेगार सांगतात तशी रक्कम गुंतवली.

दोन कोटी २८ लाख रुपये दीड महिन्यात गुंतवल्यावर त्यांना आभासी स्वरूपात त्या रकमेचे ३४ कोटी रुपये झाल्याचे दिसत होते. त्यांनी रक्कम काढून घेण्याचा पर्याय निवडला, त्यावेळी त्यांना त्या रकमेवरील टॅक्स भरावा लागेल, असे सांगितले. त्यावेळी त्यांनी स्वत:ची रक्कम तरी काढून घेता येईल का, अशी विचारणा केली. तेव्हा ती रक्कम देखील त्यांना काढता आली नाही. आपली फसवणूक झाल्याची खात्री होताच त्यांनी सायबर पोलिसांत फिर्याद दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा तपास करीत आहेत.

अशी झाली फसवणूक...

सुरवातीला सीए श्रीगोंदे यांच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून लिंक पाठविण्यात आली. त्यावर क्लिक करताच त्यांना शेअर मार्केटच्या एका व्हॉट्‌सॲप ग्रुपमध्ये जॉईन करून घेण्यात आले. त्यावर सायबर गुन्हेगारांच्याच लोकांचे जास्त लाभ मिळाल्याचे अनुभव होते. आपल्यालाही एवढी मोठी रक्कम कमावण्याची संधी असल्याचा समज करून सुरवातीला ‘सीए’नी एक लाख रुपये गुंतवले. त्यांना तातडीने २५ हजार रुपयांचा परतावाही दिला. त्यानंतर मात्र सव्वादोन कोटी गुंतवले, पण एक रुपयाही परत मिळाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT