MP Balu Dhanorkar Passed Away esakal
महाराष्ट्र बातम्या

Balu Dhanorkar: बाळू धानोरकरांच्या जागी कोण लढणार? काँग्रेसमधून 7 नेत्यांची नावे चर्चेत

काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाने चंद्रपूर लोकसभेची जागा रिक्त झाली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं काही दिवसांपुर्वी निधन झालं. त्याच्या निधनाने चंद्रपूर लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या ठिकाणी लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपही आपला उमेदवार उभा करण्याची शक्यता असल्याने काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे. (Latest Marathi News)

चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवार शोधण्यासाठी काँग्रेसने ऑनलाईन सर्व्हे घेतला होता. मात्र, सध्या काँग्रेसमधून लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सात नेते इच्छूक असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.(Marathi Tajya Batmya)

चंद्रपूर खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर कुणाला उमेदवारी द्यावी यासाठी काँग्रेसकडून हा सर्व्हे करण्यात येत आहे. तर चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सुभाष धोटे, विनायक बांगडे, आमदार प्रतिभा धानोरकर, मनोहर पाऊणकर, प्रकाश देवतळे आणि अनिल धानोरकर या सात नेत्यांची नावे चंद्रपूर लोकसभेसाठी चर्चेत आली आहेत.(Marathi Tajya Batmya)

चंद्रपूर खासदार बाळू धानोरकर हे काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार होते. त्यांच्या निधनाने राज्यातील काँग्रेस खासदारांची संख्या शून्य झाली आहे. त्यामुळे 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही जागा काँग्रेसला ही जागा निवडून आणणे प्रतिष्ठेचे बनले आहे. त्यामुळे काँग्रेसने या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. म्हणूनच काँग्रेसने ऑनलाईन सर्व्हे करून उमेदवाराचा शोध सुरू केल्याचं सांगितलं जात आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२८ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट इतिहासात घडणार दुर्मिळ क्षण? एकाच दिवशी दोन देशात कसे खेळणार भारतीय संघ

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

Marathi News Live Updates : महाकाळा परिसरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

SCROLL FOR NEXT