dr. Babasaheb aambedkar jayanti

 

solapur sakal

महाराष्ट्र बातम्या

सोलापुरात ‘डीजे’चा दणदणाट थांबला! आवाजाची मर्यादा पाळून डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त ८८ मंडळांच्या मिरवणुका; पोलिसांची ‘एक बेस एक टॉप’लाच परवानगी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रविवारी सोलापूर शहरात 88 मंडळांच्या मिरवणुका निघाल्या. पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या आदेशाचे पालन करीत मंडळांनी आवाजाची मर्यादा पाळून जयंती उत्सव साजरा केला. मिरवणुकीतही ‘एक बेस एक टॉप’ पहायला मिळाला.

तात्या लांडगे

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रविवारी (ता. १९) सोलापूर शहरात ८८ मंडळांच्या मिरवणुका निघाल्या. पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या आदेशाचे पालन करीत मंडळांनी आवाजाची मर्यादा पाळून जयंती उत्सव साजरा केला. मिरवणुकीतही ‘एक बेस एक टॉप’ पहायला मिळाला. आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी वेळीच समजावल्याचेही पहायला मिळाले.

सोलापूर शहरात २१२ मंडळांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली. त्यातील ८८ मंडळांनी सार्वजनिक मिरवणुकीत सहभाग नोंदवला. जोडभावी पेठ, फौजदार चावडी व सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक मंडळे होती. जयंती मिरवणुकीच्या निमित्ताने तीन पोलिस उपायुक्त, सात सहायक पोलिस आयुक्त, २४ पोलिस निरीक्षक, ६१ सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि ९९५ अंमलदारांचा पोलिस बंदोबस्त नेमला होता. पोलिसांच्या जोडीला ६०० होमगार्ड व एक राज्य राखीव पोलिस बलाची (एसआरपीएफ) एक तुकडी देखील होती.

सकाळी साडेदहापासूनच पोलिस ठाण्यांचे अधिकारी मिरवणूक मार्गावर दाखल झाले होते. पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्यासह तिन्ही उपायुक्तांनी देखील मिरवणुकीची पाहणी केली. सर्व मंडळांनी मिरवणुकीसाठी लावलेल्या कंटेनरमध्ये ‘एक बेस एक टॉप’ असल्याची त्यांनी खात्री केली. काही मंडळांनी ज्यादा लावलेले साऊंड, बेस व टॉप पोलिसांनी काढायला भाग पाडले. यावेळी अधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाईचा इशारा देखील त्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना दिला होता. त्यामुळे मिरवणुकीत डीजेच्या दणदणाट यंदा थांबल्याचे दिसले. विशेष बाब म्हणजे बहुतेक मंडळांनी यंदा आकर्षक देखावे सकारले होते. मिरवणुका पहायला आलेल्यांचे लक्ष देखावे आकर्षिक करीत होते.

आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांवर कारवाई

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत सर्वच मंडळांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन केले. तीन-चार मंडळांनी दोन बेस दोन टॉप लावण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी ते जास्त साऊंड बॉक्स काढायला लावले. आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळाविरुद्ध कायदेशीर कारवाई होईल.

- प्रताप पोमण, सहायक पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

पोलिसांनी दोनदा मोजला आवाज, आता...

जयंती मिरवणुकीला सुरवात होण्यापूर्वी सोलापूर शहर पोलिसांनी सकाळच्या सत्रात मिरवणुकीत सहभागी मंडळांने लावलेल्या साऊंडचा आवाज मोजला. त्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांकडे आठ डेसिबल मीटर (मशीन) दिले होते. रात्री आठच्या सुमारास पुन्हा एकदा पोलिसांनी सर्व मंडळांच्या साऊंड सिस्टिमचा आवाज मोजला. त्यात सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांविरूद्ध न्यायालयात खटले पाठविले जाणार आहेत.

‘त्या’ मंडळावर कारवाई, साऊंड सिस्टिमही होणार जप्त

शनिवारी (ता. १८) मध्यरात्री सोलापुरातील सरस्वती चौकात आम्रपाली मंडळाने ‘चार बेस चार टॉप’ लावून आवाज केला होता. सोशल मिडियावर त्याचे व्हिडिओ प्रसारित होत होते. पोलिसांना खबर मिळताच फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव राऊत आपल्या पथकांसह तेथे दाखल झाले. त्यांनी ते वाहन पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर तीन बेस तीन टॉप काढून घेतले आणि रविवारी मिरवणूक असल्याने वाहन सोडले. परंतु, त्या मंडळावर कारवाई निश्चितपणे होईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT