solapur zp ceo manisha awhale  sakal
महाराष्ट्र बातम्या

मागील तारखा टाकून विकासकामांना वर्क ऑर्डर? जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील कामांची यादी संशयाच्या भोवऱ्यात; सीईओ तपासणार मंजुरी आदेश

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने अनेक विभागांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे मागील तारखा टाकून वर्क ऑर्डर देण्याची शक्कल काही विभागांचे अधिकारी लढवत असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत पोचल्या आहेत. या पार्श्वभूमीवर समाजकल्याण विभागाच्या कामांची यादी संशयाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने अनेक विभागांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे मागील तारखा टाकून वर्क ऑर्डर देण्याची शक्कल काही विभागांचे अधिकारी लढवत असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत पोचल्या आहेत. या पार्श्वभूमीवर समाजकल्याण विभागाच्या कामांची यादी संशयाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना ५० हजारांऐवजी एक लाख रुपयांचे अनुदान वितरित केल्यावरून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाची चौकशी सुरु आहे. त्यातच आता या विभागाने आचारसंहितेपूर्वी घाईघाईत मंजूर केलेल्या कामांची यादी काटेकोरपणे पडताळून पाहिली जाणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून किती व कोणकोणत्या कामांना मंजुरी दिली, किती कामांच्या वर्क ऑर्डर निघाल्या याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी वारंवार मागवूनही त्यांना रविवारपर्यंत यादी मिळाली नव्हती.

दुसरीकडे पंढरपूरसह इतर तालुक्यातील काही गावांमधील पदाधिकाऱ्यांनी आमच्या कामांच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली नाही, पण मागून आलेले कामांचे प्रस्ताव लगेचच मंजूर झाले आणि त्यामागे टक्केवारीचा संशय असल्याच्या तक्रारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत गेल्या आहेत. दरम्यान, अनेक कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यापूर्वीच आचारसंहिता लागू झाल्याने मागील तारखा टाकून काही कामांना मंजुरी दिल्याच्याही तक्रारी त्यांच्यापर्यंत पोचल्या आहेत. त्याअनुषंगाने आता या विभागातील प्रत्येक वर्क ऑर्डरची काटेकोर पडताळणी मुख्य कार्यकारी अधिकारी करणार असल्याचेही खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले.

सीईओंकडे समित्यांचे अधिकार, तरी...

जिल्हा परिषदेतील सर्वच समित्यांचे अधिकार प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे गेले आहेत. पण, घाईघाईत एका शासन निर्णयाचा आधार घेऊन एका ओळीच्या ठरावानुसार जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभागाने सीईओंच्या परस्पर जवळपास ५० ते ५५ कोटींच्या विकासकामांना मंजुरी दिल्याचेही सूत्रांनी सांगितले. दरम्यान, तक्रारींच्या अनुषंगाने आचारसंहितेपूर्वी मंजूर केलेल्या त्या सर्व कामांची पडताळणी केली जाणार आहे.

सर्वच विभागांकडील वर्क ऑर्डरची माहिती मागविली

आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही विभागाला कोणत्याच विकासकामांची वर्क ऑर्डर काढता येत नाही. दुष्काळासंबंधीची कामे त्याला अपवाद आहेत. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कोणकोणत्या विभागाने किती वर्क ऑर्डर दिल्या आहेत, याची माहिती (रजिस्टर) मागविली आहे.

- कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT