solapur city murder case 

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

सोलापुरात भर चौकात रस्त्यावर तरुणाचा खून! छातीवर 8 वार, डोक्यात घातला दगड; 6 आरोपींनी मोबाईलवर ठेवला रक्तचरित्र चित्रपटाचा डायलॉग, मयताला ३ बायका, ८ मुले

जीमवरून घरी जाणाऱ्या सुरेश कृष्णा श्रीराम (वय ३५, रा. रफिक नगर, अक्कलकोट रोड एमआयडीसी, सोलापूर) याचा सहा जणांनी सकाळी नऊच्या सुमारास ७० फूट रोडवरील भर चौकात खून केला. दुचाकीवरून जाताना एकाने मागून काठीने जोरात मारून सुरेशला खाली पाडले. त्याचवेळी तेथे दबा धरून बसलेल्या सहा जणांनी कोयत्याने एकापाठोपाठ सात ते आठ वार केले.

तात्या लांडगे

सोलापूर : जीमवरून घरी जाणाऱ्या सुरेश कृष्णा श्रीराम (वय ३५, रा. रफिक नगर, अक्कलकोट रोड एमआयडीसी, सोलापूर) याचा सहा जणांनी सकाळी नऊच्या सुमारास ७० फूट रोडवरील भर चौकात खून केला. दुचाकीवरून जाताना एकाने मागून काठीने जोरात मारून सुरेशला खाली पाडले. त्याचवेळी तेथे दबा धरून बसलेल्या सहा जणांनी कोयत्याने एकापाठोपाठ सात ते आठ वार केले. शेवटी एकाने सुरेशच्या डोक्यात मोठा दगड घातला. त्यात सुरेशचा चेहरा चेंदामेंदा झाला. दरम्यान, सुरेश श्रीराम हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. त्याच्याविरुद्ध विनयभंग, चोरी, दरोडा, मारामारी असे दहा गुन्हे दाखल आहेत. दुसरीकडे संशयित आरोपींपैकी तिघांवरही पूर्वीचे गुन्हे आहेत.

मयत सुरेशची पत्नी लक्ष्मी श्रीराम यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी मौलाली चौक परिसरातून सर्व संशयितांना दोन तासांतच पकडले. २०१७ पासून रेड्डी व श्रीराम यांच्यात वराह पालनावरून वाद सुरू होता. मयताने विष घालून काही वराह जाणीवपूर्वक मारून टाकल्याचा संशय रेड्डी याला होता. त्यातून वाद सुरू होते. २०२० मध्ये संशयित आरोपींनी सुरेशला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्याविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.

या खटल्याची आता न्यायालयात सुनावणी सुरू होणार होती. तत्पूर्वी, संशयित आरोपी आमच्यावरील केस मागे घे म्हणून सुरेशवर दबाव आणत होते, अशी माहिती समोर आली आहे. संशयित आरोपींना उद्या (सोमवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे. जेलरोड वरिष्ठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश राऊत तपास करीत आहेत.

महिन्यापूर्वी पोलिसांत तक्रारी अर्ज, पण...

जीमवरून घरी येताना संशयित आरोपींनी कट रचून पतीला मारले आहे. सुरेश गेल्याने आठ लेकरं अनाथ झाली आहेत. मारणाऱ्यांना सजा व्हावी, अशी आमची मागणी आहे. संशयित आरोपी मारायला आले होते, ते धमकी देत होते म्हणून एक महिन्यापूर्वी पोलिसांकडे अर्ज दिला होता. पण, त्यांना काहीच झाले नाही, असे मयताची पत्नी गीता सुरेश श्रीराम यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले. पोलिसांनी हा दावा फेटाळला आहे.

मृतदेह पाहून रस्त्यातच कुटुंबीयांचा आक्रोश

सुरेशचा खून झाल्याची खबर त्याच्या नातेवाइकांना समजली. नीलम नगरातील त्याचे नातेवाईक अशोक चौक परिसरात दाखल झाले. त्यावेळी सुरेशचा मृतदेह पाहून त्याच्या कुटुंबीयांनी रस्त्यातच आक्रोश केला. ही घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुरेश गाडीवरून पडल्यावर परिसरात दबा धरून बसलेले सगळेजण त्याच्यावर तुटून पडल्याचे फुटेजमध्ये दिसते.

मोबाईलवर रक्तचरित्र चित्रपटाचा डायलॉग

खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी विजय अशोक श्रीराम, रोहित बसप्पा अण्णारेड्डी, करण अशोक श्रीराम, सुमीत अशोक श्रीराम, राहुल बसप्पा अण्णा रेड्डी (सर्वजण रा. कुंचीकोरवी गल्ली, मौलाली चौक) आणि सुभाष सगडा (रा. नई जिंदगी) यांना पोलिसांनी अवघ्या दोन तासांतच पकडले. तत्पूर्वी, संशयित आरोपींनी (हत्यारे बनवून देणारा सुभाष सगडा वगळून) मोबाईल स्टेटसवर रक्तचरित्र चित्रपटातील डायलॉग तथा व्हिडिओ ठेवला होता. ‘एक साथ नही एक एक कर के मारेंगे’ असा तो व्हिडिओ होता. त्यांनी कट रचून जाणीवपूर्वक भर रस्त्यात सुरेशचा खून करून परिसरात दहशत पसरविली होती. अटक केल्यावर एकाच्याही चेहऱ्यावर पश्चात्तापाचे भाव दिसत नव्हते, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

दोन दिवस जीमला गेला नाही, पण...

ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा बोर्डावर आला होता. यात संशयित आरोपींना शिक्षा होणार हे निश्चित होते. त्यातून संशयित आरोपींनी सुरेशसोबत चार दिवसांपूर्वी वाद घातला होता. जिवे मारण्याची धमकी देखील दिली होती. त्यामुळे सुरेश दोन दिवसांपासून अशोक चौकातील जीमला गेला नव्हता. मात्र, रविवारी (ता. ३) सुरेश नेहमीप्रमाणे जीमला गेला. जीमवरून घरी जाताना संशयित आरोपींनी त्याचा भर रस्त्यातच खून केला.

सुरेशच्या दोन्ही भावाचेही खूनच झाले

मयत सुरेश श्रीराम याच्या आजोबापासून संशयित आरोपी अण्णा रेड्डी यांच्याविरुद्ध वाद होते. सुरेशला एकूण तीन भाऊ असून एक दिव्यांग आहे. त्याच्या अन्य दोन्ही भावांचा देखील अशाच वादातून खून झाले आहेत, अशी चर्चा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऐकायला मिळाली. सुरेशला तीन बायका व सहा मुली, दोन मुले आहेत, असेही त्याच्या नातेवाईकाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT