Abu Azmi  esakal
महाराष्ट्र बातम्या

Abu Azmi Threat Call : औरंगजेबच्या विरोधात चुकीचं ऐकणार नाही; धमकीनंतर अबू आझमी म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. त्यांचा मोबाईल पीएकडे होता. त्यावर त्यांना शिवीगाळ करुन धमकी देण्यात आली. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध कुलाबा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

औरंगजेबाबाबत अबू आझमी यांनी वक्तव्य केले होते. औरंगजेब बादशाह हा वाईट माणूस नव्हता, त्याचा खरा इतिहास जेव्हा समोर येईल तेव्हा हिंदू समाजही ते मान्य करेल, असं विधान अबू आझमी यांनी केले होते. हिंदूंवर हल्ले होत असतील तर मुस्लीमांवरही हल्ले होत आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे, या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती.

हेही वाचाः प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

त्यानंतर आज अबू आझमी यांनी आज माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, औरंगजेब महान बादशहा होता. त्याच्याविरोधात मी चुकीचं काहीच ऐकणार नाही. मला अशा धमक्या येतय असतात. आम्ही देशप्रेमी आहोत. मात्र कट्टपंथीयांना हे आवडत नाही. यापूर्वीही अशा धमक्या आलेल्या आहेत. पोलिसांनी कधीच काही ठोस कारवाई केलली नाही.

लव्ह जिहादच्या मुद्द्यावर बोलतांना अबू आझमी म्हणाले की, आपल्या कम्युनिटीमध्ये लग्न करावं, असं मी नेहमी सांगत असतो. सर्वांनी तसंच करावं म्हणजे सामाजिक विवादाचे मुद्दे उपस्थित होणार नाहीत. मात्र असं केल्याने काहींच्या वोट बँकेला मदत होते, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT