Ajit Pawar Post Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar Post: "चूक स्वीकारा पण भाजपप्रमाणे ट्विट डिलीट करू नका", अजित पवारांची चुकीची पोस्ट शरद पवार गटाने सुधारली?, नेमकं प्रकरण काय?

Ajit Pawar Post: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यावरून शरद पवार गटाने अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Ajit Pawar Post: राष्ट्रवादी नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या कामांची, भेटीची आणि इतर गोष्टींची माहिती आपल्या सोशल मिडीयावर शेअर करताना दिसतात. अशातच अजित पवारांनी त्यांच्या सोशल मिडीया एक्स या अकाऊंट वरून शेअर केलेली पोस्ट चुकीची असल्याचा दावा करत शरद पवार गटाने ती चूक स्वीकारा पण भाजपप्रमाणे ट्विट डिलीट करू नका असं आवाहन करत अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.

अजित पवारांची पोस्ट काय?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मिडीया एक्सवरती एक फोटो आणि पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे, "अरुणाचल प्रदेशमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आणि पदाधिकारी यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचं मनापासून स्वागत केलं. या भेटीदरम्यान लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा पार पडली", अजित पवारांची ही पोस्ट शेअर करत शरद पवार गटाने हल्लाबोल केला आहे.

अरुणाचल प्रदेशमध्ये गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सहभागच घेण्यात आला नव्हता. तर मग आमदार झाले तरी कधी? असा सवाल शरद पवार गटाने उपस्थित केला आहे.

शरद पवार गटाचा हल्लाबोल

अजित पवारांच्या पोस्टला शरद पवार गटाने उत्तर दिलं आहे. "काय....? अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रवादीचे आमदार...? अहो, अरुणाचल प्रदेशमध्ये गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सहभागच घेण्यात आला नव्हता... मग आमदार झाले तरी कधी ? हा आता... अदृश्य शक्तीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे आमदार अरुणाचलप्रदेशच्या यादीत दाखवले असतील, तर ती वेगळी गोष्ट...अरुणाचलप्रदेश आणि नागालँडमध्ये तितकाच फरक आहे जितका महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आहे, हे समजणं अत्यावश्यक आहे."

"आता घटनाबाह्य पद्धतीने सत्तेवर आल्यानंतर हा राज्या राज्यातील फरकांचा गोंधळ उडणारच म्हणा...! त्यामुळे ज्या भाजपसोबत आपण गेलात त्यांच्या, खोटं बोल पण रेटून बोल या परंपरेचा वाण नाही पण गुण लागला हे दुर्दैव !"

"आपला रोखठोक बाणा अजूनही शाबूत असेल तर, चूक स्वीकारा पण भाजपप्रमाणे ट्विट डिलीट करू नका, ही नम्र विनंती!", अशी पोस्ट सोशल मिडीयावर करत अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT