Aditya Thackeray , Devendra Fadnavis and Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

लाठीचार्जचा आदेश देणारा खरा जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यावर निशाणा

कार्तिक पुजारी

Mumbai News - शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरुन आज राज्यपालांची भेट घेतली. रमेश बैस यांच्या भेटीनंतर युवा नेते आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. जालन्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम घ्यायचा म्हणून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. पोलीस अशा आंदोलनात लाठीचार्ज करत नाहीत. त्यामुळे जालना घटनेचा खरा जनरल डायर कोण?, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर निशाणा साधला.

लाठीचार्ज झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि इतर नेते जालन्यामध्ये पोहोचले होते. लाठीचार्ज करण्याची आवश्यकता नसते. अशा महत्त्वाच्या विषयात पोलिस विचारल्याशिवाय लाठीचार्जचा निर्णय घेऊ शकत नाहीत. आम्हीही सरकारमध्ये राहिलोय. त्यामुळे मी तुम्हाला याची खात्री देऊ शकतो. अशा प्रकरणात मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडून आदेश दिले जातात, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणतात आम्ही आदेश दिले नाहीत, मग सरकार कसं चालू आहे. मुख्यमंत्र्यांना समन्स द्यावी यासाठी आम्ही राज्यपालांची भेट घेतली. अनागोंदी सरकार सुरु आहे. गद्दार, घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये खरे जनरल डायर होण? ज्यांनी लाठीचार्जचे आदेश दिले. त्यांची नावे लोकांसमोर येणे गरजेचे आहे, असं ते म्हणाले.

याप्रकरणात काय होईल हे मी आत्ताच सांगतो. समिती बसवली गेली आहे, रिपोर्ट आल्यानंतर एखाद्या आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्याचे निलंबन केले जाईल. त्यामुळे ज्याने लाठीचार्जचे आदेश दिले त्याला काहीही होणार नाही, हे दुर्दैव आहे. राज्यपालांना यासाठीच आम्ही भेटलो. यावर कारवाई होईल अशी अपेक्षा. मुख्यमंत्र्यांनी थोडी लाच उरली असेल तर राजीनामा द्यावा, असं आदित्य म्हणाले.

मविआच्या आमदारांना निधी मिळालेला नाही. जे तिकडे गेले त्यांना निधी मिळतोय. मराठ्यांचे आंदोलन चिघळले तर जबाबदारी कोण घेईल. एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाच्या पत्रकारांचा अटक झालीये. देशात लोकशाही संपली आहे. मणिपूरमध्ये जे महिलांचं रक्त सांडलं त्याबाबत बोललं पाहिजे, जालना येथे लाठीचार्ज केला ते भारतवासी आहेत, G20 साठी जे फडका लावून लपवलेत ते देखील भारतवासी आहेत, असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT