Asim Sarode Alleged Cm Eknath Shinde MLAs Esakal
महाराष्ट्र बातम्या

Asim Sarode Alleged Cm Eknath Shinde MLAs: एअर हॉस्टेसचा विनयभंग? गुवाहाटीमध्ये २ आमदारांना कुणी मारहाण केली? असीम सरोदे यांचे गंभीर आरोप

Asim Sarode Alleged Cm Eknath Shinde Mlas: एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार खासदार यांनी बंड करून आता जवळजवळ दोन वर्षे झाली आहेत. मात्र, अद्याप त्या घटनेबाबत अनेक दावे समोर येतच आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Asim Sarode Alleged Cm Eknath Shinde Mlas: एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार खासदार यांनी बंड करून आता जवळजवळ दोन वर्षे झाली आहेत. मात्र, अद्याप त्या घटनेबाबत अनेक दावे समोर येतच आहेत. अशातच अॅड. असीम सरोदे यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांचा उल्लेख करत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. त्याचबरोबर केलेल्या आरोपाबाबत सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. त्याचबरोबर सरोदेंनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना शिंदे गटाच्या आमदार खासदारांनी 'आरोप केल्याशिवाय यांचं वजन वाढत नाही असा त्यांचा समज आहे, म्हणून ते असे दावे करत असल्याचा आरोप', केला आहे.

असीम सरोदेंचे आरोप काय आहेत?

शिंदे समर्थक आमदार आणि खासदारांनी बंड करून गुवाहाटी गाठली. यावेळी असीम सरोदेंनी आपल्या भाषणात गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये थांबलेल्या एअर होस्टेसचा विनयभंग व त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी कोणत्याही आमदाराचं नाव घेतलेलं नसलं, तरी त्यांनी त्यावेळी त्या हॉटेलमध्ये थांबलेल्या शिंदे गटातील बंडखोर आमदारांचा यावेळी भाषणात उल्लेख केला. धाराशिव येथे रविवारी संध्याकाळी ‘निर्भय बनो’ या कर्यक्रमात असीम सरोदे बोलत होते.

पुढे बोलताना ते सरोदे म्हणाले, "गुवाहाटीत ज्या हॉटेलमध्ये हे (शिंदे समर्थक आमदार, खासदार) थांबले होते, तिथे इतर ग्राहकांना परवानगी नव्हती. पण स्पाईसजेट आणि इंडिगो या दोन विमान कंपन्यांनी त्यांच्यासाठी काही खोल्या त्या हॉटेलमध्ये बुक केल्या होत्या. त्या हॉटेलशी त्यांचं वर्षाचं कंत्राट होतं. तिथे वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेस राहत होत्या. त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला गेला. एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कुणी केला? हे महाराष्ट्राने शोधलं पाहिजे. दारूच्या नशेत हे नेते झिंगत होते. हा पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही", असं असीम सरोदे यांनी म्हटलं आहे.

गुवाहाटीत दोन आमदारांना मारहाण

"गुवाहाटीतल्या त्या हॉटेलमधून आमदार पळून गेले. ८ किलोमीटर गेल्यानंतर त्यांना पकडून आणलं गेलं. त्यांना हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली. त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली. त्या दोन आमदारांना कुणी मारहाण केली?"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT