Jitendra Awhad esakal
महाराष्ट्र बातम्या

Jitendra Awhad: ''महाराज, तुम्हाला शब्द देतो.. तुमचा हा मावळा...'' भावनिक होत आव्हाड म्हणाले

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना मारहाण प्रकरणामध्ये काल जामीन मिळाला. त्या दिवशी विवियाना मॉलमध्ये झालेली घटना चुकीची होती, कार्यकर्त्यांचा तो संताप होता. मी तिथे नव्हतो. असं स्पष्टीकरण आव्हाडांनी दिलंय.

'हर हर महादेव' चित्रपटामध्ये बाजीप्रभू देशपांडे हे शिवरायांना एकेरी बोलतांना दिसून येतायत, शिरवळ येथे बायकांचा बाजार भरत असल्याचं दाखवलं गेलं, मराठ्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला, अफझल खान प्रसंग अतिरंजित दाखवला गेला. या सगळ्या प्रकारांमधून शिवरायांची उंची कमी करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका आव्हाडांनी ठेवला आहे. ते 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

''महाराज तुम्हाला शब्द देतो, कुणी उठो न उठो... पण ज्यावेळी तुमची बदनामी होईल तेव्हा हा तुमचा मावळा कधीही शांत बसणार नाही'' अशा भावना आव्हाडांनी यावेळी व्यक्त केल्या. यापूर्वी २०-२२ वर्षांमध्ये जेव्हा विकृतीकरणाचा विषय समोर आला तेव्हा तेव्हा मी अग्रभागीच आहे, असंही ते म्हणाले.

ठाण्यातल्या विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांना काल जामीन मंजूर झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

SCROLL FOR NEXT