Ajit Pawar and rohit pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar Latest News : रोहित पवारांनी केली चक्क अजित पवारांसोबत लंच पे चर्चा, अचानक झालेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण

विधीमंडळातील अजित पवार यांच्या दालनात मागील अर्ध्या तासापासून चर्चा सुरू

अंकिता खाणे (Ankita Khane)

कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले. विधीमंडळातील अजित पवार यांच्या दालनात मागील अर्ध्या तासापासून चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. या भेटीमध्ये कर्जत -जामखेडमधील एमआयडीसीचा मुद्दा या भेटीमध्ये चर्चेला येऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आमदार रोहित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीमागे मतदारसंघातील वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी ही भेट घेतली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अर्ध्या तासांपुर्वी रोहित पवार अजित पवारांना भेटण्यासाठी गेले आहेत. गेल्या अर्ध्या तासांपासुन या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे.

कर्जत -जामखेडमधील एमआयडीसीचा मुद्दा रोहित पवार यांनी सभागृहात मांडला होता. तर यासंदर्भात त्यांनी विधानभवनाच्या आवारात पावसात एकट्याने आंदोलनही केलं होतं. तर या कारणासाठी रोहित पवार यांनी अजित पवारांची भेट घेतल्याची चर्चा आहे. एमआयडीसीचा विषय रोहित पवार यांनी लावून धरला होता, त्यानंतर दोघांची भेट महत्वाची मानली जात आहे. अजित पवार आणि रोहित पवार यांनी दालनात चर्चेनंतर एकत्र जेवण केल्याची माहिती आहे. अचानक झालेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

अजित पवार यांच्यासह ८ आमदांरानी शिवसेना-भाजपला समर्थन देत मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षात मोठी फुट पडली. त्यानंतर रोहित पवार यांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. तर या फुटीनंतर आज रोहित पवार यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT