महाराष्ट्र बातम्या

Yavatmal Crime: वाढदिवसाला गोळीबार करणाऱ्या 'भाई'च्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, चार दिवसांची पोलीस कोठडी

स्वतःच्या जन्मदिनाच्या पार्टीत हवेत गोळीबार करणारा सराईत गुन्हेगार उमेश किशोरचंद राय याला येथील न्यायालयाने एक डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Crime News: स्वतःच्या जन्मदिनाच्या पार्टीत हवेत गोळीबार करणारा सराईत गुन्हेगार उमेश किशोरचंद राय याला येथील न्यायालयाने एक डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. संशयित आरोपी रायला वणी पोलिसांनी परवा रात्री एका शेतात आयोजित वाढदिवसाच्या पार्टीतून अटक केली.

उमेश किशोरचंद राय या कोलार पिंपरी येथील रहिवासी आहे. तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. नुकताच खुनाच्या गुन्ह्यात तो शिक्षा भोगून बाहेर आला आहे.

गेल्या 27 नोव्हेंबरला त्याचा वाढदिवस असल्याने राजूर ते भांदेवाडा मार्गावर असलेल्या शेतात पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत अनेकजण सहभागी झाले होते. डीजेच्या ठेक्यावर ताल धरत असताना उमेश राय याने त्यांच्याजवळील पिस्तुलातून हवेत दोन बार उडविले होते.

उमेश हा सराईत गुन्हेगार असल्याने पोलिस त्याच्या मागावरच होते. वणीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजित जाधव यांनी उमेशला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, पिस्तूल आढळून आली. त्याच्यावर गुन्हा नोंद करून करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला एक डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! विमानतळावरून १५ नवीन विमानांची उड्डाणे; कुठे आणि कधीपासून? जाणून घ्या...

Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघात पदार्पणाची संधी द्यायला हवी का? ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतो, अरे त्या पोराला खेळू द्या...

Pune Crime : सासरच्या छळाला कंटाळून महिलेने संपविले जीवन; सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Water Supply News : शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी सुरळीत राहणार

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

SCROLL FOR NEXT