Ajit Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar Baramati : अजित पवारांवर नामुष्की? मराठा आंदोलकांमुळे बारामतीत जाणं टाळलं!

मराठा आंदोलकांच्या विरोधामुळे अजित पवारांना बारामती तालुक्यातील त्यांचा कार्यक्रम रद्द करावा लागला आहे.

रोहित कणसे

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा काही दिवसांपासून पेटला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी यासाठी अमरण उपोषण सुरू केलं आहे. यादरम्यान राज्यातील अनेक गावात राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नामुष्कीचा सामना करावा लागला आहे. मराठा आंदोलकांच्या विरोधामुळे अजित पवारांना बारामती तालुक्यातील त्यांचा कार्यक्रम रद्द करावा लागला आहे.

बारामती शहर आणि तालुक्यात कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना फिरू देणार नाही, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आली. त्यातून सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाच्या कार्यक्रमाला विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर आता अजित पवारांनी या कार्यक्रमाला जाणे टाळले आहे. साम टीव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

अजित पवारांकडून हा कार्यक्रम रद्द केल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यभरात राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी तसेच राजकीय कार्यक्रमांना मराठा क्रांती मोर्चाकडून विरोध केला जात आहे. बारामती मध्ये देखील अजित पवारांच्या या दौऱ्याला विरोध केला जात होता. काल तसं लेखी निवेदन स्थानिक पोलीस आणि कारखान्याच्या प्रशासनाला देण्यात आलं होतं. काल दिवसभर चर्चा झाल्यानंत देखील तोडगा निघू शकला नव्हता. अखेर अजित पवारांनी माळेगाव साखर कारखान्याच्या या कर्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे संभाव्य संघर्ष टळला आहे.

यावेळी पोलिसांनी कारखान्याच्या परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तसेच सकाळ पासूनच मराठा आंदोलक देखील या कार्यक्रमस्थळी जमा होत होते.

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील अनेक गावांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे बारामती शहर आणि तालुक्यात कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना फिरू देणार नाही, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आली होती. मोळी पूजनाच्या कार्यक्रमाला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध नाही. कारखान्याचे संचालक अथवा सभासदांनी मोळी पूजन करावे, पण कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला कार्यक्रमाला बोलाऊ नये, असे पत्रक या वेळी सकल मराठा समाजाकडून देण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT