Ajit Pawar On Bullock Cart Racing Sakal media
महाराष्ट्र बातम्या

बैलगाडा शर्यतीत अनेकांनी राजकारण केलं, अजित पवारांचा भाजपवर निशाणा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : अनेक दिवसांपासून बंदी असलेल्या बैलगाडा शर्यतीला अखेर सर्वोच्च न्यायालयाने काही अटी-शर्तीनुसार परवानगी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतींचा (Bullock Cart Racing) धुरळा उडणार आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Maharashtra Deputy CM Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा देखील साधला आहे.

राज्यात अनेक सरकार आले आणि गेले. न्यायालयात हा विषय असल्यानं इथं शेतकऱ्यांना नाराजी पत्करावी लागायची. शेतकरी परस्पर शर्यत घेण्याचा प्रयत्न करत होते. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार आल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे यांनी वारंवार संसदेत बैलगाडा शर्यतीबाबत प्रश्न उपस्थित केला. दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते हे सर्व बैलगाडा शर्यतीसाठी आग्रही होते. आम्ही राज्य सरकारतर्फे चांगला वकील दिला. अनेकदा आमच्या सहकाऱ्यांनी दिल्ली वाऱ्या केल्या. आज त्याचं यश आम्हाला मिळालं आहे, असं अजित पवार म्हणाले.

काही लोकांनी राजकारण केलं - पवार

काही लोकांनी बैलगाडा शर्यतीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. यश मिळालं नसताना देखील काही भागात पोस्टर लावले आणि बैलगाडा शर्यती सुरू झाल्या, अशा अफवा पसरवल्या होत्या. अनेकांनी निवडणुकांसाठी पण बैलगाडा शर्यतीचा वापर केला. आम्हाला निवडून द्या आम्ही बैलगाडा शर्यत सुरू करू, असे खोटे आश्वासन अनेकांनी दिले होते, असंही अजित पवार म्हणाले.

शर्यती सुरू झाल्यानं आनंद -

घोड्याच्या स्पर्धा चालू आहेत. पण, बैलगाडा शर्यतीला परवानगी का नाही? असा प्रश्न होता. पण, आता न्यायालयाने बैलगाडा शर्यत सुरू करण्याला परवानगी दिली आहे. त्यामुळए मला खूप आनंद झाला आहे. माझ्यापेक्षा शेतकरी वर्गाला आनंद झाला आहे. तमाम शेतकऱ्यांच्यावतीने न्यायालयाच्या निकालाबाबत समाधान व्यक्त करतो, असंही अजित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip BJP Leader Statement : कथित ऑडिओ क्लिपवर प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्यानंतर भाजपच्या मोठ्या नेत्याचे खळबळजनक वक्तव्य

IND A vs NZ A Live: लोकेश राहुल ०, यशस्वी जैस्वाल १७; भारताचा डाव ११३ धावांवर गडगडला, नागपूरचा यश राठोड एकटा भिडला

Drought Crisis: सरकारी विभागांच्या निधीला कात्री ; दुष्काळाचा फटका; मुख्यमंत्र्यांच्या २० टक्के निधी कपातीच्या सूचना

Latest Marathi News Live Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा

Belgaum-Kolhapur Direct Railway : सर्वेक्षण झाले, पण प्रत्यक्ष काम कधी? बेळगाव-कोल्हापूर रेल्वेच्या प्रतीक्षेला कंटाळून नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत, जनआंदोलनाचा निर्धार

SCROLL FOR NEXT