ajit pawar on jayant patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar Video : 'विरोधी पक्षनेते पद नको! मला संघटनेत पद द्या', अजित पवार-जयंत पाटील वाद चव्हाट्यावर

संतोष कानडे

मुंबईः अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातला सुप्त संघर्ष यापूर्वी लपून राहिलेला नाही. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात उघडपणे दोन्ही नेत्यांनी एकमेकांना बोचणारी विधानं केली आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आज आयोजन करण्यात आलेलं होतं. अजित पवारांनी राज्यातील परिस्थितीवरुन शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. शिवाय मागच्या काही वर्षातील प्रदेशाध्यक्षांच्या कार्यकाळाचा आढावा घेतला. त्यात जयंत पाटील यांच्याबद्दलही त्यांनी भाष्य केलं.

अजित पवार बोलतांना म्हणाले, मला विरोधी पक्षनेते पदामध्ये काहीही रस नव्हता. आमदारांनी आग्रह केला, सह्या केल्या त्यामुळे मी विरोधी पक्षनेता झालो. आता एक वर्ष झालं मी काम करत आहे. काहींचं म्हणणं आहे तू कडक वागत नाही.. मग आता काय ह्यांची गचुरी धरु काय? असं म्हणून अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये त्यांच्या भूमिकांना होत असलेला विरोध बोलून दाखवला.

अजित पवार पुढे म्हणाले की, मला विरोधी पक्षनेते पदामध्ये रस नव्हताच. त्यामुळे आता मला संघटनेत पद द्या. कुठलंही पद द्या, त्याला मी न्याय देतो.

त्यामुळे अजित पवारांना संघटनेत कुठलं पद हवंय? असा प्रश्न उपस्थित होतोय. ते प्रदेशाध्यक्ष पदावर तर दावा करीत नाहीत ना? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

काय म्हणाले जयंत पाटील?

अजित पवारांच्या भाषणानंतर जयंत पाटील म्हणाले की, पाच वर्ष एक महिना झालं मी अध्यक्ष बनलो आहे. दादांनी महिने मोजले आहेत. मी काय सांगतोय बुथ कमिट्या करा, 'एक तास राष्ट्रवादीसाठी' ही मोहीम राबवा.. माझी विनंती आहे, असं म्हणून जयंत पाटलांनी खदखद बोलून दाखवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: दिल्लीतलं वातावरण तापलं! राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार 'गांधी स्मृतीस्थळा'वर दाखल

Pandharpur Wari Relief : आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा; आमदार प्रशांत बंब यांच्या पाठपुराव्यानंतर हात दाखविलेल्या ठिकाणी थांबणार एसटी बस

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशी बरसला अन् श्रेयस अय्यरचा कर्णधार म्हणून पहिला विजय; भारताची झिम्बाब्वेवर मात, मालिकेत आघाडी

Delhi Lathicharge Protest: दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा बिडकीनमध्ये तीव्र निषेध; निलजगाव फाटा ते पोलिस ठाण्यापर्यंत विद्यार्थ्यांची पायी रॅली

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा आणखी एक विश्वविक्रम, १९८९ पासून सचिन तेंडुलकरच्या नावावर होता हा विक्रम...

SCROLL FOR NEXT