ajit pawar  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: पुण्याचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर अजितदादा पुन्हा ॲक्टिव्ह! कृषिमंत्री धनंजय मुंडेंसोबत महत्वाची बैठक

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत दुपारी 3 वाजता मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयामध्ये अजित पवार बैठक घेणार

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाल्यापासून पुण्याचे पालकमंत्री अजित पवार होणार का? अशी चर्चा सुरु होती. अखेर त्यावर काल (बुधवारी) शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. भाजपला पुणे शहरासह ग्रामीण भागात पक्षाचा प्रभाव वाढविण्यासाठी पालकमंत्रीपद महत्त्वाचे असतानाही राजकीय वाटाघाटीत भाजपने एक पाऊल मागे घेत चंद्रकांत पाटील यांच्याकडील हे पद पवार यांना बहाल केले. तर चंद्रकांत पाटील यांना सोलापूरचे पालकमंत्रीपद देण्यात आले.

दरम्यान अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद जाहीर झाल्यानंतर आज अजित पवार पुन्हा ॲक्टिव्ह मोडवर दिसून येत आहेत. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत आज दुपारी 3 वाजता मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयामध्ये अजित पवार बैठक घेणार आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार यांना थ्रोट इन्फेक्शन असल्यामुळे अजित पवारांनी कोणाचीही भेट घेतली नव्हती. परंतु, ते बैठकीला देखील गैरहजर होते. त्यांच्या या गैरहजेरीनंतर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाल्या होत्या.

तर आज अजित पवार पुन्हा ॲक्टिव्ह मोडमध्ये दिसत आहेत. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत दुपारी 3 वाजता मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयामध्ये अजित पवार बैठक घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांना पुन्हा एकदा पुर्णविराम मिळाला आहे. ते आजारी असल्याने बैठकांना गैरहजर होते. मात्र, ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदी 'लेम डक पंतप्रधान'; विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीचार्चवरून राज ठाकरेंचा घणाघात...

India squad for World Cup 2027: शुभमन गिल-रोहित शर्मा ओपनर; शमी, भुवीचे पुनरागमन! वन डे वर्ल्ड कप २०२७ साठी रवी शास्त्रींनी निवडला भारतीय संघ

Live Updates Marathi : पुण्यात कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात

Mumbai-Ahmedabad Highway: मुंबई-अहमदाबाद महामार्गाला कवच; १३ ठिकाणी स्मार्ट कॅमेरे बसवणार, प्रत्येक वाहनावर करडी नजर राहणार

Rautwadi Waterfall Parking Facility : राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची तुफान गर्दी अन् तासनतास वाहतूक कोंडी! 300-400 वाहनांच्या पार्किंगसाठी 'हा' पर्याय उपलब्ध?

SCROLL FOR NEXT