Jayant Patil 
महाराष्ट्र बातम्या

"दादांनी माझ्या कार्यकाळाचे महिने मोजले, पण..."; शरद पवारांसमोर अजितदादा-जयंत पाटलांची जुगलबंदी

Sandip Kapde

राष्ट्रवादी काँग्रेसने आज जाहीर मेळावा घेतला. यावेळी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी वेगवेगळ्या विषयावर भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी देखील कार्यकर्त्यांना संबोधित केले. याच व्यासपीठावरुन २४ वर्षापूर्वी पक्ष स्थापना केल्याची घोषणा केल्याचे त्यांनी सांगितले.

जंयत पाटील म्हणाले, सर्व नेत्यांनी सगळ्या विषयाला स्पर्श केला आहे. मागे काही उरले नाही. शरद पवार यांना  मानणारे लोक आहेत. ज्या मतदारसंघात निवडणूक लढवली नाही तिथे देखील शरद पवार यांना मानणारे लोक आहेत.
 
अजित पवार यांनी माझ्या कार्यकाळाचे महिने मोजले. ५ वर्ष १ महिना झाले मी अध्यक्ष आहे. पण मी नेहमी सांगतो बूथ किमिटीवर काम करा. एक तास राष्ट्रवादीसाठी हे मी नेहमी सांगत असतो. बूथ कमिटी केल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही. अजित पवार यांनी नेत्यांचे काम करताना कोणत्या बूथ कमिटीमधून आला हे सांगावे, तसेच लिहून घ्यावे, असे जयंत पाटील म्हणाले.

शरद पवार यांची शिदोरी आहे म्हणून आपला पक्ष आहे. त्यांनी गोड बोलून माणसे जोडली आहेत. गोड बोलून संघटना जोडण्याचे कौशल्य त्यांनी दाखवले. आज राष्ट्रवादी पवार साहेबांच्या स्वभावावर उभी आहे हे विसरू नका, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

जयंत पाटील म्हणाले, आज राजकीय संस्कृती बदलली आहे. शेतकरी, मध्यम वर्गीय मेटाकुटीला आला आहे. मात्र शरद पवार हे आशेचा किरण आहेत. येणारा काळ महत्वाचा आहे. हिंदुत्व दाखवून मत घेतली जात आहेत. शरद पवार यांनी महाराष्ट्राचे पुरोगामित्व टिकवण्यासाठी सत्ता सोडली पण पुरोगामी विचार सोडला नाही.

अजित पवार यांनी सांगितले तरुणांना संधी देऊन महाराष्ट्रात पक्ष उभा केला. पक्ष आता तरुणांकडे जबाबदारी देणार आहे. मला २०१९ साल आठवते. हा पक्ष सोडून अनेक जन गेले. आम्ही भाषण करायचो हा गेला, तो गेला अनेक गेले तरी चालेल. कारण आमच्या कडे शरद पवार आहेत ते अनेक नेते तयार करू शकतात. आमच्याकडे विद्यापीठ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT