Ram Shinde  
महाराष्ट्र बातम्या

Rohit Pawar : अजितदादा मविआचे नाही तर महायुतीचे उपमुख्यमंत्री; भाजप आमदार राम शिंदे असं का म्हणाले?

रवींद्र देशमुख

मुंबई - कर्जत-जामखेड येथील एमआयडीसीचा मुद्दा पावसाळी अधिवेशनात गाजत आहे. एमआयडीसीसाठी रोहित पवार आक्रमक आहेत. यावरून रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहेत. त्यातच राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

राम शिंदे म्हणाले की, पंधरा-सोळा वर्षांपासून एमआयडीसी करण्याच्या संदर्भामध्ये माझा प्रयत्न आहे. रोहित पवारांचा देखील प्रयत्न आहे. परंतु त्यांचा प्रयत्न निरव मोदींंसाठी होता, हे निष्पन्न झाल्याने प्रॉब्लेम झाला आहे. मात्र कर्जतला एमआयडीसी ही होणारच आहेत.

अजित पवार आणि रोहित यांच्या भेटीवरून राम शिंदेंनी विचारण्यात आलं. त्यावर राम शिंदे म्हणाले, अजित पवार हे महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री नाहीत तर ते महायुतीचे उपमुख्यमंत्री आहेत. मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. तसेच ज्यांनी त्यांची भेट घेतली ते विरोधी पक्षाचे आमदार आहेत.

दरम्यान माझं आणि अजित पवार यांचे बोलणं झालं आहे. कधी एमआयडीसी करायची हे आम्ही आता ठरवू. तर दुसरीकडे रोहित पवार म्हणाले होते की, नीरव मोदी यांनी राम शिंदे यांच्या आमदारकीच्या काळातच जमीन घेतली आहे. त्यामुळे नीरव मोदींची कोणी मदत केली, याची चौकशी करावी. एकंदरीत कर्जत-जामखेड येथील एमआयडीसी प्रकरण प्रतिष्ठेचा विषय बनली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk Video : सोनम वांगचुक यांनी उपोषण का सोडले, सरकारशी काय चर्चा झाली? व्हिडिओ शेअर करत सगळंच सांगितलं

भारतीय संघ 'घरच्या' मैदानावर पाहुणा म्हणून खेळणार! बाहेरचा संघ यजमान म्हणून मिरवणार; नेमकं असं का होणार? जाणून घ्या वेळापत्रक

Latest Marathi News Live Update : आज रात्री आम्हाला अटक केली जाऊ शकते; CJP संस्थापक अभिजीत दीपके यांचा दावा

Car Stunt Video: धावत्या कारच्या छतावर बसून जीवघेणा स्टंट! Video Viral होताच पोलिसांची कारवाई, तरुणाने कान पकडून मागितली माफी

CM Joseph Vijay Movie : कायदेशीर लढाई आणि सेन्सॉरच्या आक्षेपानंतर अखेर 'जननायकन' रिलीज! थलपती विजय यांच्या शेवटच्या चित्रपटाची धमाकेदार एन्ट्री, 50 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती

SCROLL FOR NEXT