Buldhana Bus Accident Esakal
महाराष्ट्र बातम्या

Buldhana Bus Accident : अपघात सदोष निर्मिती अन् मानवी त्रुटींमुळे…; भीषण अपघातानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया

रोहित कणसे

नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समृध्दी महामार्गावर बुलडाणा - सिंदखेड राजा येथे अपघात होऊन 25 हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. समृध्दी महामार्गावर बसचा टायर फुटल्याने बस दुभाजक व खांबाला धडकली आणि बसने पेट घेतला. या भीषण दुर्घटनेनंतर समृध्दी महामार्गावरील वाहनांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा प्रकर्षाने ऐरणीवर आला आहे.

या अपघातानंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ हा अपघात झाला. दरम्यान विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी ट्वीट करत अपघाताबद्दल दुखः व्यक्त केले आहे.

तसेच अजित पवारांनी समृद्धी महामार्गावर सतत होत असलेल्या अपघातांवरून राज्य सरकारला तातडीनं उपाययोजना करण्याच्या मागणीचा गांभिर्याने विचार करण्याची मागणी केली आहे.

अजित पवार काय म्हणाले?

नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समृध्दी महामार्गावर बुलढाणा - सिंदखेडराजा येथे अपघात होऊन २५ हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. समृध्दी महामार्गावर बसचा टायर फुटल्यानं बस दुभाजक व खांबाला धडकली आणि बसनं पेट घेतला.

या भीषण दुर्घटनेनंतर समृध्दी महामार्गावरील वाहनांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा प्रकर्षानं ऐरणीवर आला आहे. अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य शासनानं तज्ञांच्या सल्ल्यानं यावर तत्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. आजच्या भीषण बस दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाशांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. दुर्घटनेतील जखमी प्रवाशांना शासनामार्फत चांगले उपचार मिळून ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो.

समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे...

समृद्धी महामार्गावर सुरुवातीपासून अपघातांची मालिका सुरु आहे. या अपघातात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे. यावर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी विरोधी पक्षांच्या वतीनं सातत्यानं करण्यात आली आहे. शासनानं आतातरी या मागणीचा गांभीर्यानं विचार करावा, अशी मागणी करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT