NCP Ajit Pawar CM eknath shinde  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : 'अजून मी आठ महिने मुख्यमंत्री' शिंदेच्या या विधानावर अजितदादांची प्रतिक्रिया; म्हणाले, त्यांना...

राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेकांपासून फारकत घेतलेले दोन दिग्गज शरद पवार आणि अजित पवार ही जोडी पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर दिसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

रोहित कणसे

राज्यात सर्वच राजकीय पक्ष आगामी निवडणूकांच्या तयारीला लागले आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेकांपासून फारकत घेतलेले दोन दिग्गज शरद पवार आणि अजित पवार ही जोडी पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर दिसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी हे दोन नेते एकत्र येणार असल्याचे बोलले जात असतानाच अजित पवारांनी आपल्याला याबद्दल काहीही माहिती नसल्याचे म्हटले आहे.

अजित पवारांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, माझं नाव कुठेही टाकतात, मला त्याबद्दलची माहिती नाहीये. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार एखा व्यासपीठावर दिसणार या चर्चांना ब्रेक लागला आहे.

यासोबतच अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल विचारले असता अजित पवारांनी 'नो कमेंट्स'असं म्हणत उत्तर देणे टाळले. रोहित पवार-जितेंद्र आव्हाड यांच्यात सुरु असलेल्या टीकानाट्यावर देखील त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.

मुख्यमंत्र्यांना तो अधिकार

अजून मी आठ महिने मुख्यमंत्री आहे, आपल्याला खूप फिरावा लागणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, त्यांनी कार्यकर्त्यांना काय सांगावं हा त्यांचा अधिकार आहे. तुमच्या पोटात का दुखतंय. ते राज्याचे प्रमुख आहेत, प्रमुखपदावर राहण्यासाठी लागणारं बहुमत त्यांच्या पाठिशी आहे. ते काय बोलले हे मला माहिती नाही. पण त्यांनी सांगितलं असेल, कधीकधी माणून बोलून जातो. त्यावर वाईट वाटायचं काही कारण नाही असेही अजित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT