महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : अजित पवारांना बालेकिल्ल्यात धक्का! पिंपरी चिंचवडच्या 'या' नेत्याने सोडली साथ; शरद पवार गटात प्रवेश होणार?

संतोष कानडे

पुणेः पुण्यातला पिंपरी चिंचवड हा भाग अजित पवारांचा बालेकिल्ला समजला जातो. अजित पवारांशिवाय मतदारसंघांमध्ये पानही हालत नाही, असं राजकीय जाणकार बोलतात. पण आता पिंपरी चिंचवड शहरामध्ये अजित पवार यांना धक्का बसला आहे, त्यांच्या जवळच्या पदाधिकाऱ्यांनी साथ सोडली. तसं राजीनामा पत्र पदाधिकाऱ्याने पक्षाकडे सादर केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पक्षाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा पाठविला आहे. अजित गव्हाणे यांच्यासोबत अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवड शहरातील इतर काही पदाधिकाऱ्यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा पक्षाकडे पाठविला आहे.

राजीनामा सादर करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये यश साने, राहुल भोसले आणि भालेकर यांच्या नावाचा समावेश आहे. 20 जुलैला पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पिंपरी चिंचवड शहरात जाहीर सभा आहे. या सभेत अजित गव्हाणे आणि अजित पवार गटाचे इतर काही पदाधिकारी शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात अजित पवार यांना शरद पवार यांनी मोठा धक्का दिल्याचं बोललं जातंय.

लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला अपयश बघावं लागलं होतं. तर शरद पवारांच्या आठ उमेदवारांचा दणदणीत विजय झाला होता. लोकसभा निवडणुकीमध्ये पदरी आलेलं अपयश विधानसभेत भरुन काढण्यासाठी अजित पवार गटासह महायुतीमधील घटकपक्ष कामाला लागले आहेत. त्यातच पिंपरी चिंचवडमध्ये काही पदाधिकारी अजित पवारांची साथ सोडत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT