Ramdas Kadam On Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: "थोडे दिवस आले नसते तरी..." महायुतीत कुरबुरी सुरूच, अजित पवारांना सोबत घेतल्याने शिवसेना नेत्याची नाराजी

Ramdas Kadam: रामदास कदम यांच्या या विधानानंतर अजित पवार यांना महायुतीत घेतल्यामुळे कुरबुरू सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

आशुतोष मसगौंडे

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पक्षाचा 58 वा वर्धापण दिन दणक्यात साजरा केला. मुंबईतील एनएससीआय सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष होते.

मात्र, शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे, अदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत तर अजित पवार यांना महायुतीत घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त करत या कार्यक्रमात सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

"मी हात जोडून सांगतो त्या भाजपला सांगा, जसे भाजपचे उमेदवार 2 महिने आधी दिले, तसे आमचे 15 उमेदवार पण 2 महिर्न आधी दिले असते तर आज चित्र वेगळे असते. अमित शहांना सांगा मला 100 उमेदवार द्या, मी 90 उमेदवार जिंकून नाही दाखवले तर सांगेल ते ऐकतो. या निवडणुकीत यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन, देवेंद्र फडणवीसांचे पण अभिनंतर आणि मागून आलेल्या आपल्या अजित दादांचेही अभिनंदन. पण ते थोडे आले नसते तरी चालले असते."

रामदास कदम यांच्या या विधानानंतर अजित पवार यांना महायुतीत घेतल्यामुळे कुरबुरू सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

आपल्या भाषणात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि अदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, "आदित्यचे काय योगदान आहे. आमची मंत्रिपदे त्याला दिली. शिवसेनाप्रमुख जेव्हा होते तेव्हा बैठका व्हायाच्या, नेत्यांना विश्वासात घेऊन पुढे जायचे. मात्र हा माणूस एकटाच सगळं बघतो. शिवसेना यांना यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी वाटते."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhuleshwar Ganesh Idol Accident: मुंबईत गणपती बाप्पाच्या आगमनात हृदयद्रावक दुर्घटना; दोघांचा मृत्यू, चिमुकल्या मुली जखमी

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2026

Crispy Rava Paneer Corn Pockets: नॉनव्हेजला ब्रेक, पण चवीला नाही! श्रावणात वीकेंडला बनवा हा कुरकुरीत नाश्ता

Savitribai Phule Kishori Samriddhi Scheme: १८-१९ वर्षांच्या अविवाहित मुलींना एकरकमी २०,००० रुपयांची भेट; जाणून घ्या योजनेचे निकष!

SCROLL FOR NEXT