Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: खासदार अमोल कोल्हेंच्या मतदार संघात भल्यापहाटे अजित पवारांची पाहणी, म्हणाले, 'मी जे सांगितलं ते फायनल'

Ajit Pawar Visit: अजित पवारांनी आज अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात पाहणी दौरा केला.

अंकिता खाणे (Ankita Khane)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुणे दौऱ्यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार अमोल कोल्हेंविरोधात दंड थोपटले आणि अमोल कोल्हेंना निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटलांनी जीवाचं रान केलं, पण यावेळी पाडणार म्हणजे पाडणारच, असं ते म्हणाले. काल अजित पवारांनी ते वक्तव्य केलं त्यानंतर आज सकाळीच ते अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात पाहणी करण्यासाठी पोहोचले.

दरम्यान, माध्यमांनी यावेळी अजित पवारांना कोल्हेंना काल आव्हान दिलं त्यानंतर आज हा दौरा याबाबत पत्रकारांनी प्रश्न केला असता ते म्हणाले की, अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि या दौऱ्याचा संबंध नाही, हा दौरा पूर्वनियोजित होता. यावेळी अजित पवारांनी पुण्यातील हडपसरमध्ये माजंरी पुलाची पाहणी केली.

आगामी लोकसभा निवडणुकीत शिरुर मतदारसंघात अमोल कोल्हेंचा पराभव करणारच असं अजित पवारांनी म्हटलं आणि आज त्यांनी अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात पाहणी दौरा केला. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

'आपला हा दौरा पूर्वनियोजित होता. अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि दौऱ्याचा संबंध नाही', अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली. त्याचबरोबर, अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया आली असेल तर त्यांना ती लखलाभ, मी काल जे सांगितलं तेच फायनल आहे, असंही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.

अमोल कोल्हेंबाबत काय म्हणाले होते अजित पवार?

"एका खासदाराने जर आपल्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं, तर बरं झालं असतं. एक खासदार एक ते दीड वर्षापूर्वी राजीनामा देणार होते. त्या खासदाराला उमेदवारी मी दिली आहे. त्या खासदाराला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलं आहे. त्यांना खासगीत असं बोलवा, समोरा समोर."

"आता त्यांचं चाललंय सगळं. पण, त्यांचं मधल्या काळात मतदारसंघात लक्ष नव्हतं, ते मतदारसंघात फिरत नव्हते, त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळचे माझे जे वरिष्ठ आहेत, त्यांनाही सांगितलेलं मी राजीनामा देतोय, मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर परिणाम होऊ लागला आहे, मी काढलेला एक सिनेमा शिवरायांवर असला तरी, तो चालला नाही. माझ्या एकंदरीत प्रपंचावर, आर्थिक गोष्टींवर परिणाम होतोय, अशाही गोष्टी त्यांनी येऊन सांगितलेल्या."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT