Akola Crime : sakal
महाराष्ट्र बातम्या

Akola Crime :वसतीगृहात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोन विद्यार्थ्यांसह सेल्समनला अटक

Crime : अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांसह एका सेल्समनला अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Akola : शहरातील एका प्रख्यात संस्थेच्या वसतीगृहात एका १४ वर्षीय मुलीवर तिघांनी सामुहिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली.

याप्रकरणी सिव्हील लाईन्स पोलीसांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांसह एका सेल्समनला अटक केली आहे. या घटनेने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका १४ वर्षीय मुलीला एका युवकाने दुचाकीवर बसवून पळवून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मोठी उमरी भागातील रहिवाशी असलेल्या मुलीच्या आईने सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी सुरुवातीला कलम ३६३ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी ही मुलगी घरी परतली. मुलीने तीच्यावर तिघांनी सामुहिक अत्याचार केल्याची आपबिती सांगितल्यानंतर आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तत्काळ आईने पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सामूहिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. त्यानुसार १४ वर्षीय मुलीला अनुरागने दुचाकीवर बसवून अकोला शहरातील रामदास पेठ हद्दीमधील एका महाविद्यालयाच्या वसतिगृहात नेले. त्या ठिकाणी आरोपी अनुराग मनोहर चौधरी (२०) रा. यावल जि. जळगाव, दीपक विठ्ठल मडावी, (२५) रा. सिंधी कॅम्प अकोला तसेच अंकुश विलास वक्टे, (२५) रा. कौलखेड अकोला यांनी मिळून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.

महिला अधिकाऱ्यांनी नोंदवले बयाण

याप्रकरणात सदर मुलीचे बयान सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यातील महिला अधिकारी कर्मचाऱ्यांसमोर नोंदवण्यात आले. त्याने तीने घटनाक्रम सांगितला. त्यातून प्रकरणाचा उलगडा झाला. याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी कलम ३७६, ३७६ दोन एल, ३७६ तीन, ३७६ आय, ३७६ डी.ए., ३,४,६,१२ पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT