Supriya Sule Amit Shah Sakal
महाराष्ट्र बातम्या

Supriya Sule : "अमित शाह खरं बोलतात, माझा त्यांच्यावर विश्वास"

भाजपाने प्रताप सरनाईकांच्या कुटुंबीयांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही सुप्रिया सुळेंनी केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

प्रताप सरनाईकांसह काही नेत्यांना गेल्या काही दिवसांत क्लिनचिट देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. याचविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. माझा अमित शाहांवर विश्वास आहे, ते मला नक्की न्याय देतील, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. शिवाय भाजपाने सरनाईक कुटुंबाची माफी मागितली पाहिजे अशी मागणीही केली आहे.

सुप्रिया सुळे पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. बंडानंतर शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधातल्या आर्थिक गैरव्यवहाराचा तपास बंद करण्याचा अहवाल स्विकारण्यात आला आहे. त्यावरुन सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. सुळे म्हणाल्या की, आधीचा आरोप खोटा होता असं म्हणावं लागेल. असं असेल तर तुम्ही त्यांची बदनामी केली म्हणून त्यांच्या कुटुंबाची आणि महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. जर त्यांनी चूक केली असेल तर क्लिनचिट कशी देत आहात? भाजपाने दोन्ही बाजूंनी विचार करायला हवा.

याबद्दलच पुढे बोलताना सुळे म्हणाल्या की, अमितभाई शाह यांच्यावर माझा खूप विश्वास आहे. एक महिला खासदार म्हणून शाह मला नक्कीच न्याय देतील, असा विश्वास आहे. अमित शाह खरं बोलतात, याचा अनुभव मला अनेकदा आला आहे. मी संसदेत हा विषय माहितीच्या आधारे मांडणार आहे. मला सीबीआयचा वापर कसा करतात, याचं जनरल नॉलेज नाही. ईडी वगैरे काय असतं हे मला माहित नव्हतं. आता ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप झाले, त्या सगळ्याची क्रोनोलॉजी पाहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat Canada Visit : भारत 'महाशक्ती' की ‘विश्वगुरू’ ? कॅनडातील भाषणात मोहन भागवतांनी सांगितला भारतीय विचार

Nepal Flood: नेपाळमध्ये पुन्हा जलप्रलयाचा धोका! भोटेकोसी नदी फुगली; ७८८ मृत्यू, तीन हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर फडणवीसांचा मोठा संकेत; ‘चर्चेची दारे खुली, कायदेशीर चौकटीत तोडगा काढू’

Marathi News Live Updates : महाराष्ट्रात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज; 'या' तीन जिल्ह्यांना विजांसह पावसाचा इशारा

Panchganga River Incident : रक्षाबंधनाची राखी हातात अन्... बहिणीच्या डोळ्यांदेखतच भावाने पंचगंगा नदीत मारली उडी; रुई पुलावर थरार

SCROLL FOR NEXT