amol Kolhe and Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

Onion Export : कांदा खरेदीबाबत फडणवीसांनी केलेल्या घोषणेनंतरही अमोल कोल्हे आक्रमक; म्हणाले...

रवींद्र देशमुख

Onion Market News - कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावण्याच्या केंद्राच्या निर्णयाविरोधात शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झाले आहेत. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी पुण्यात रास्तारोको केला.

तर तिकडे सरकारमध्ये सामील असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी तातडीने केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. मात्र या भेटीआधीच फडणवीसांनी मास्टरस्ट्रोक मारत जपानमधून कांदा खरेदीबाबत मोठी घोषणा केली. यावर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमोल कोल्हे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहे. प्रत्येक वेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावरच उतरायलाच हवं का? मागील तीन ते चार वर्षे शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नव्हता, तेव्हा फडणवीस कुठं गेले होते. आता त्यांनी केलेली घोषणा ही तात्पूरती मदत आहे. यावर दीर्घकालीन उपाय हवा.

कांद्याला एमएसपीच्या सुचित आणलं गेलं पाहिजे, तसेच कांद्याला चार हजार रुपये प्रतिक्विंटलने दर द्यावी, असंही कोल्हे यांनी म्हटलं.

दरम्यान तातडीने कांदा निर्यात शुल्क रद्द करण्यात यावा, हीच मागणी आहे. त्याशिवाय समाधान होणार नसल्यां अमोल कोल्हे यांनी म्हटलं. ही मागणी दोन लाख टन कांदा खरेदी करण्यासाठी नसून निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी रास्तारोको करत असल्याचं अमोल कोल्हे यांनी नमूद केलं.

फडणवीस यांनी ट्विट करून सरकार दोन लाख टन कांदा खरेदी करणार असल्याची जपानमधून घोषणा केली. याबाबत केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांनी देखील भूमिका स्पष्ट केली.

(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT