Amol Mitkari  Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

"तेव्हा हे चड्डी-टोपीत होते"; अमोल मिटकरींची चंद्रकांत पाटलांवर टीका

शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्यानं चंद्रकांत पाटलांवर टीका.

सुधीर काकडे

राज्यात गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार जुंपल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच भाजपनेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्याबद्दल बोलताना त्यांचा एकेरी उल्लेख केला होता. या मुद्यावरून आता राज्यातील वातावरण तापलेलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर आता महाविकास आघाडीतील नेत्यांकडून टीका होत असल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यानंतर आता राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांनी देखील चंद्रकांत पाटलांवर टीका केली.

राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी शायरीच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. तेरी जुबान कतरना बहुत जरूरी है, तुझे मर्ज है की, तू बार-बार बोलता है! असं म्हणत मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला. एवढ्यावरच न थांबता मिटकरी पुढे असंही म्हणाले की, शरद पवार जेव्हा देशाच्या संसदेत होते, तेव्हा हे चड्डी आणि टोपीत होते, अशी खोचक टीका देखील त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी काल सांगलीमध्ये एका कार्यक्रमात विधानसभेच्या समीकरणांबद्दल बोलताना शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला होता. आपल्याया राज्यात शरद पवारचं आव्हान नाही, आम्ही त्याला ५४ आमरांच्या वर जाऊ दिलं नाही, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केल्याचा त्यांच्यावर आरोप होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Alert : जून-जुलैमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार; माॅन्सून श्रीलंकेवरच रेंगाळला, 7 दिवसांत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता, आयएमडीचा नवा अंदाज काय?

Pune News: हिंजवडीतील IT कंपनी अचानक बंद? पगार नाही, चेक बाऊन्स... ७०० इंटर्न आणि कर्मचाऱ्यांचा वेतन घोटाळा उघड

Abhishek Banerjee Attack : अभिषेक बॅनर्जींवर जीवघेणा हल्ला; विटा-दगडं फेकत डोळे आणि छातीवर वार, ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाल्या, सत्ताधारी खुनी...

Hero New Bike : पेट्रोल पंपावर जायचं विसरा! लॉन्च झाली Hero ची दमदार बाइक; 72km मायलेजसह जबरदस्त स्मार्ट फीचर्स, किंमत फक्त...

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT