Amol Mitkari slams bjp leader Mohit Kamboj esakal
महाराष्ट्र बातम्या

Mohit Kamboj हा कोणाच्या चड्डीचा... मिटकरींचा हल्लाबोल

धनश्री ओतारी

भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक ट्वीट करत खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादीचा एक बडा नेता लवकरच जेल मध्ये जाईल, असं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. दरम्यान, त्याच्या या ट्विटनंतर राष्ट्रवादी नेते सडकून टीका करताना दिसत आहेत. मोहित कंबोज हा कोणाच्या चड्डीचा नाडा आहे, हे सगळ्यांना माहीत असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.(Amol Mitkari slams bjp leader Mohit Kamboj)

राज्यातील मागील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे तरुंगात आहेत. त्यानंतर आता आणखी एक राष्ट्रवादीचा नेता लवकरच तरुंगात जाणार असल्याचे भाजपा नेते मोहित कंबोज यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कंबोज यांच्यावर जोरदार टीका केली. ते माध्यमांशी बोलत होते. "मोहित कंबोज हा कोणाच्या चड्डीचा नाडा हे सगळ्यांना माहीत आहे," अशा शब्दात मिटकरींनी कंबोज यांची खिल्ली उडवली आहे.

मोहित कंबोज हा भाजपचा भोंगा आहे. हा भोंगा जनतेच्या प्रश्नावर, स्त्री अत्याचारावर, जीएसटी आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कधीही वाजत नाही, अशी टीका मिटकरींनी दिली. मोहित कंबोज हा 'लष्कर-ए-देवेंद्र' मधील तिसऱ्या फळीतील नेता असल्याची टीका मिटकरींनी केली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रायव्हरच्या बाजूला मान खाली घालून बसलेले मनोज जरांगे; तब्येत अचानक बिघडली, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू, नेमकं काय झालं?

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

Chamoli Tunnel Tragedy: ३० तासांनंतरही ३ मजूर बेपत्ता; बोगद्यातील साचलेले पाणी ठरतेय रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये मुख्य अडथळा

Marathi News Live Updates : पुण्यातील डेक्कन परिसरातील कॅफेत पहाटे कोयता गँगचा धुमाकूळ

Khambatki Ghat Traffic : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; पारगाव-खंडाळा परिसरात वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT