Umesh Kolhe Murder Case | Amravati News
Umesh Kolhe Murder Case | Amravati News 
महाराष्ट्र

उमेश कोल्हे हत्याकांड : NIA च्या तपासातून आणखी एक धक्कादायक खुलासा

सकाळ डिजिटल टीम

या खून प्रकरणातील आरोपी इरफान खानला अमरावती पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती.

अमरावती इथे झालेल्या उमेश कोल्हे हत्याकांडात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. दरम्यान, आता एनआयएने आणखी महत्वाचा खुलासा केला आहे. अमरावतीच्या उमेश कोल्हे यांची हत्या काही व्यक्तींच्या गटाकडून करण्यात आली आहे. हत्यारांकडून देशात दहशत माजवण्याचा कटही रचला जात असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दाव्यामुळे धर्माच्या आधारावर शत्रुत्व वाढवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहितीही एनआयएनच्या खुलास्यातून समोर आली आहे. (Killing of Maharashtra Amravati Umesh Kolhe crime case)

उमेश कोल्हे खून प्रकरणातील मुख्य आरोपी इरफान खान (३२) याला अमरावती पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सायंकाळी नागपुरातून अटक केली होती. दरम्यान, याप्रकरणी सातही आरोपींची एनआयएने (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) चौकशी केली असून आरोपींच्या चौकशीत पीएफआय (Popular Front of India) कनेक्शन समोर आलं आहे. कोल्हे खून प्रकरणात (Umesh Kolhe Murder Case) अटक करण्यात आलेल्या सात आरोपींना जिल्हा न्यायालयाने सोमवारी ८ जुलैपर्यंत ट्रान्झिट रिमांडवर कारागृहात पाठवले होते. (Umesh Kolhe Murder Case)

उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी रात्री १०.३० च्या सुमारास अमरावती येथील श्याम चौक परिसरातील घराजवळ चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नूपुर शर्माला पाठिंबा देणारी सोशल मीडिया पोस्ट आणि केमिस्ट उमेश कोल्हे यांच्या हत्येचा संबंध असल्याची माहिती अमरावती पोलिसांना मिळाली होती. मात्र, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने ते आधी उघड करण्यात आले नव्हते, असे पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी सांगितले होते.

भारतीय जनता पक्षाच्या निलंबित प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या काही व्हॉट्सअॅप ग्रुप्समध्ये पोस्ट शेअर केल्याबद्दल उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आल्याचा दावा या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी सुरुवातीला केला होता. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिल्याने अमरावतीमध्ये केमिस्ट उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे. उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी रात्री दुकानातून घरी परतत असताना हत्या करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

SCROLL FOR NEXT