anil deshmukh esakal
महाराष्ट्र बातम्या

अनिल देशमुखांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांना ठोठावण्यात आलेली ईडी (ED custody) कोठडी आज संपली आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा त्यांना कोर्टात हजर करण्यात आले.. यावेळी कोर्टाने अनिल देशमुखांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे,

तळोजा किंवा आर्थररोड कारागृहात रवानगी

कोर्टात पुन्हा ईडीकडून देशमुखांची कस्टडी मागण्याची शक्यता वर्तवली जात होती. तर आता त्यांना बेल मिळणार की पुन्हा एकदा ईडी कोठडी याकडे लक्ष लागून राहिलं होतं. ED कडून पाचवेळा अनिल देशमुखांना ईडीचं समन्स पाठवले. वैद्यकीय कारणं, सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली सुनावणी, अशी कारणं अनिल देशमुखांकडून सांगण्यात आली. पण अचानक अनिल देशमुख चौकशीला हजर राहिले आणि त्यानंतर प्रदीर्घ चौकशीनंतरही समाधान झालं नाही म्हणून ईडीनं देशमुखांना अटक केली. कोर्टाकडून अनिल देशमुखांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांना तळोजा किंवा आर्थररोड कारागृहात रवानगी होणार असल्याचे समजते. दुसरीकडे ऋषिकेश देशमुख यांच्या जामीन अर्जावर सेशनकोर्टात सुनावणी सुरू झाली आहे

अनिल देशमुख प्रकरणाला वेगळं वळण

दरम्यान अनिल देशमुख प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. कारण सचिन वाझे पोलिसांना सहकार्य करण्यास तयार असल्याचं समजत आहे. अनिल देशमुख यांनी बार मालकांकडून वसुली करायला सांगितल्याचा आरोप वाझे आणि परमवीर यांनी केला होता. या प्रकरणी परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून 100 कोटी वसुलीचा आरोप केला होताआता याप्रकर्णी सचिन वाझे काय माहिती देणार याकडे लक्ष लागले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

Yavatmal Healthcare: १०२ वर वारंवार फोन, तरी रुग्णवाहिका आली नाही; राळेगावात जंगलातच महिलेची प्रसूती

Marathi News Live Updates : लोहगावमध्ये रस्त्यावरील खड्ड्याला चक्क चिकटपट्टी लावून पुणेकराचे अनोखे आंदोलन, महापालिकेच्या कारभाराचा जाहीर निषेध

दीड तासांचा प्रवास ५ मिनिटांत पूर्ण होणार! वर्सोवा केबल-स्टेड पुलास हिरवा कंदील, २१ किमीचे अंतर अवघ्या दीड किमीवर

SCROLL FOR NEXT