सिताराम कुंटे Sakal
महाराष्ट्र बातम्या

अनिल देशमुख प्रकरण : सिताराम कुंटेंची इडीकडून चौकशी

माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे आज सकाळी 11 वाजता इडी कार्यालयात हजर झाले होते.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सल्लागार आणि राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे आज सकाळी 11 वाजता इडी कार्यालयात हजर झाले होते. अनिल देशमुख गृहमंत्री असताना करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांसदर्भात सूताराम कुंटे यांचा जबाब नोंदवला गेला असल्याची माहीती सुत्रांकडून मिळाली आहे. अनिल देशमुख गृहमंत्री असताना पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाला होता, पैसे घेऊन अनेकांना पोस्टिंग दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

या बदल्यांच्या संदर्भात राज्याच्या गुप्तचर विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मि शुक्ला यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा अहवाल तत्कालीन पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांना दिला होता, तर सुबोध जयस्वाल यांनी तो अहवाल गृहविभागाचे तत्कालीन अतिरीक्त मुख्य सचिव सीतीराम कुंटे यांना दिला होता, त्यानंतर सरकारनं त्या अहवालावर काहीही काकवाई केली नसल्याचा आरोप आहे.

अनिल देशमुख यांच्या 100 कोटींच्या घोटाळ्याच्या प्रकरणातही सीताराम कुंटे यांच्याकडून इडीला काही माहीती हवी आहे, यासाठी इडीनं त्यांना समन्स बजावलं होतं. याआधीही दोन वेळा इडीनं सीताराम कुंटे यांनी समन्स बजावलं होतं, पण दोन्ही वेळा ते हजर झाले नव्हते. अनिल देशमुख यांच्या कार्यकाळात सीताराम कुंटे हे गृह विभागात अतिरीक्त मुख्य सचिव या पदावर कीर्यरत होते. त्यामुळं त्याच्या चौकशीतून बरीच महत्वाची माहीती मिळू शकते असं इडीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET UG Result पेपरफुटीनंतर गुणांचा महाघोटाळा, अन्सर की अन् स्कोअरकार्डवर वेगवेगळे गुण; बीडच्या 2 विद्यार्थ्यांचा आक्षेप

Bank Holiday: 20 ते 26 जुलैदरम्यान 'या' दिवशी बँका राहणार बंद; बँकेत जाण्याआधी पाहा RBIची यादी

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ मुंबईत CJP चे आंदोलन, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

Tukaram Mundhe यांच्या धाडीनंतर अकोल्यातील गुटखा कारवाईत मोठा ट्विस्ट, काय घडलं?

Corona Virus: कोरोना परत येतोय? महाराष्ट्रात ४८ जणांना लागण; धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT