Anil Parab  sakal media
महाराष्ट्र बातम्या

..अन्यथा बडतर्फ प्रक्रियेला सुरुवात करू; परिवहन मंत्र्यांचा इशारा

एसटी कर्माचाऱ्यांना आजपासून शो कॉज नोटीस देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

मागील काही दिवस राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. राज्यसरकराने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या जातील असे आश्वासन दिले होते. प्रवाशांचे हाल होत असून एसटी महामंडळाला तोटा होत आहे, त्यामुळे लवकरात लवकर कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे असे आवाहनही करण्यात आले होते. दरम्यान, आज पुन्हा एकदा परिवहन मंत्री यांनी एसटी कर्मचाऱ्यां संबंधित बोलले आहेत. कामावर हजर न राहिलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बडतर्फ प्रक्रियेला सुरुवात केली जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

ते म्हणाले, एसटी कर्माचाऱ्यांना आजपासून शो कॉज नोटीस देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. कर्माचाऱ्यांना कामावर हजर न राहिल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतरही कामगार कामावर हजर राहीले नाहीत, तर राज्यसरकार कारवाईला सुरुवात करणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. दरम्यान, आता परिवहन मंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर कर्मचारी कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, एसटी महामंडळातील 10 हजार कर्मचारी बडतर्फीच्या उंबरठ्यावर आहेत. निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी बोलावले जाणार आहे. म्हणणे मांडण्यासाठी 3 संधी दिल्यानंतरही गैरहजर राहिल्यास त्यांचे नावे 7 दिवसांची बडतर्फीची नोटिस दिली जाणार आहे. 7 दिवसांत म्हणणं न मांडल्यास अखेर कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात येणार आहे. नवीन वर्षात एसटीच्या 10 हजार कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT