Shivsena UBT Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena UBT: पुरातत्व विभागाने केली उद्धव ठाकरेंची कोंडी! रात्री उशिरा दिली शिवनेरीवर हेलीकॉप्टर लॅन्डींगची परवानगी

Shivsena UBT: केंद्रीय पुरातत्त्व विभागाने ऐनवेळी हेलीकॉप्टर लॅडींगची परवानगी देऊन उद्धव ठाकरेंची शिवनेरी दौऱ्याची कोंडी केली आहे.

गणेश कोरे - सकाळ वृत्तसेवा

पुणे - केंद्रीय पुरातत्त्व विभागाने ऐनवेळी हेलीकॉप्टर लॅडींगची परवानगी देऊन उद्धव ठाकरेंची शिवनेरी दौऱ्याची कोंडी केली आहे. तिथीनुसारच्या शिवजयंतीला शिवसेना पक्षप्रमुख शिवनेरीवर नतमस्तक होण्यासाठी आज येणार होते. यासाठी खासदार अमोल कोल्हे यांनी जिल्हा प्रशासनाकडे आणि केंद्रिय पुरातत्व विभागाकडे परवानगी मागितली होती.

मात्र ही परवानगी बुधवारी (ता.27) रात्री उशिरा दिल्लीतून देण्यात आली आहे. परवानगी उशिरा मिळाल्याने शिवसेना आणि महाविकास आघाडीची कोणतीही तयारी दिवसभरात झाली नव्हती. यामुळे उशिरा परवानगी देऊन पुरातत्व विभागाने ठाकरे यांची कोंडी केली आहे.

हेलीकॉप्टर लॅडींगच्या परवानगीबाबत शिवसेना पक्षश्रेष्ठींना बुधवारी रात्री उशिरापर्यंत कल्पना नव्हती. तर परवानगी देताना उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख पत्रात नव्हता. यामुळे आश्चर्यव्यक्त केले जात आहे .परवानगीची प्रत 'सकाळ'च्या हाती आली आहे.

हेलीपॅड तयार

उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या शक्यतेने सार्वजनिक बांधकाम विभागाने शिवनेरी वर हेलीपॅड देखील सज्ज करून ठेवले आहे. मात्र परवानगी उशिराने मिऴाल्याने दौरा अधांतरी झाला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT