Archeology Department Objection paid darshan of Trimbakeshwar Financial Exchange sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! त्र्यंबकेश्वरच्या पेड दर्शनावर पुरातत्त्व विभागाचा आक्षेप, आर्थिक देवाणघेवाणीवरही प्रश्‍नचिन्ह

१६ मार्चला देवस्थानच्या अध्यक्षांना पत्र देत त्र्यंबकेश्वर मंदिरातील देणग्यांसह आर्थिक देवाणघेवाणीशी संबंधित काही आक्षेपही विभागाने नोंदवले

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : त्र्यंबकेश्वरच्या पेड दर्शनाला पुरातत्त्व विभागाने आक्षेप घेतला आहे. गेल्या १६ मार्चला देवस्थानच्या अध्यक्षांना पत्र देत त्र्यंबकेश्वर मंदिरातील देणग्यांसह आर्थिक देवाणघेवाणीशी संबंधित काही आक्षेपही विभागाने नोंदवले आहेत.

राष्ट्रीय पुरातत्त्व विभागाच्या छत्रपती संभाजीनगर (पूर्वीच्या औरंगाबाद) विभागीय कार्यालयाने हे पत्र दिले आहे, त्यावर आता देवस्थानकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे त्र्यंबकराजाच्या भक्तांचे लक्ष लागले आहे.

पुरातत्त्व विभागाच्या पत्रातील आक्षेपानुसार त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारातून प्रवेश करणाऱ्या भाविकांकडून शुल्क आकारून दर्शन दिले जाते ते बंद करावे. पुरातत्त्व कायदा (एएमएएस आर) १९५८, नियम १९५९ आणि त्याचा दुरुस्ती आणि प्रमाणीकरण कायदा २०१० नुसार केंद्रीय संरक्षित स्मारकामध्ये सशुल्क दर्शनाला परवानगी नाही, हा प्रमुख आक्षेप आहे.

याशिवाय पुरातत्त्व विभागाच्या पत्रात त्या विभागाच्या डी. एस. दानवे आणि दीपक चौधरी या पथकाने १५ मार्च २०२२ ला दिलेल्या भेटीत आढळलेली निरीक्षणे पत्रात नोंदवली आहेत. याबाबत देवस्थान अध्यक्षांनी वैयक्तिक लक्ष देण्याची आणि केंद्रीय संरक्षित स्मारकाच्या नियमानुसार पालन करण्याची विनंती केली आहे.

पथकाला आढळलेल्या त्रुटी

प्रामुख्याने शिवरात्री उत्सवानिमित्त मंदिर परिसरात तात्पुरते चालणारे/मोबाईल वॉक वे आता स्मारकाच्या संरक्षित क्षेत्रातून काढून टाकण्यात यावेत. मंदिर परिसरात विविध ठिकाणी दानपेट्या ठेवण्यात आल्या आहेत, ज्या बेकायदेशीर आहेत, त्या तत्काळ हटवाव्यात. मंदिराच्या आवारात देणगी गोळा करण्याच्या पोर्टेबल केबिन बसवल्या आहेत, त्या तत्काळ काढून टाकण्यास सांगितले आहे. मंदिर परिसराच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यात सेवा न करता येणारे/न वापरलेले साहित्य टाकण्यात आले आहे, ज्यामुळे मंदिर परिसराचे पावित्र्य, दृश्य खराब होत आहे. ते ताबडतोब काढून टाकावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT