Ashish Shelar and Aditya Thackeray  
महाराष्ट्र बातम्या

Ashish Shelar : भाजप वाघनख आणत असल्याने पेंग्विन कुटुंबाच्या पोटात दुखतं; शेलारांचा ठाकरेंना टोला

रवींद्र देशमुख

मुंबई - ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. त्यासाठी सांस्कृतीक मंत्री इंग्लंडला रवाना झाले आहेत. मात्र यावरून राजकारण तापलं आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी यावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर भाजपकडून त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

भाजपचे मुंबई अध्यक्ष, आशिष शेलार म्हणाले की, हा सर्व प्रकार हास्यास्पद सुरू आहे. ही वाघनख भाजप आणत आहेत. त्यामुळे पेंग्विन कुटुंबाच्या पोटात दुखत आहेत. वाघनखं येणार म्हणून नकली वाघ स्टेटमेंट करायला लागल्याची टीका शेलार यांनी केली.

'उबाठा'ची लोक वारंवार छत्रपती आणि त्यांच्या परिवाराबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. छत्रपतींच्या शौर्यावर प्रश्न हे कोणाच्या मतांसाठी उपस्थित करत आहेत. पबमधील विषयाचा थयथयाट रस्त्यावर करायचा नसतो. हे मला आदित्य ठाकरे यांना सांगायचे, असंही शेलार यांनी म्हटलं.

शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्याबाबत शेलार म्हणाले की, संजय राऊत लिहिताना चिलीम आणि बोलताना गांजा घेऊन बोलतात. कुणीही बुद्धिमान व्यक्ती त्यावर उत्तर देणार नाही. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणाला द्यायचा हा निर्णय महापालिका घेईल, असंही ते म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी वाघनखांबाबत शंका उपस्थित करताना ते खरे आहेत की, खोटे याबाबत विचारणा केली होती. त्यावरून आदित्य ठाकरे यांच्यावर भाजपकडून कडाडून टीका करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT