Narendra modi and India allince  
महाराष्ट्र बातम्या

अशोक चव्हाण यांनी मांडलं मतांच्या टक्केवारीवरून मोदी सरकारच्या पराभवाचं गणित; म्हणाले...

रवींद्र देशमुख

मुंबई - विरोधीपक्षांनी तयार केलेल्या इंडिया आघाडीची बहुचर्चित बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर या दोन दिवशी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांनी मोदी सरकारला पराभूत कसं करता येईल, याविषयी विधान केलं.

अशोक चव्हाण म्हणाले की, २०१९ निवडणूक मध्ये आघाडीत आज जे पक्ष आहेत, त्यांना एकूण २३ कोटी ४० लाख मत मिळाले होते. तर भाजपला २२ कोटी मत मिळाली होती. तरी भाजपचा विजय झाला. तेव्हा विरोधक सगळे वेगळे होते. शिवाय भाजपने जिथे सरकारे पाडली ते सोडून ११ मुख्यमंत्री या आघाडीत आहेत. कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्ष तोडला तरी आमचे सरकार आले.

अशोक चव्हाण पुढं म्हणाले की, आमचा केवळ विरोध करायचा अजेंडा नाही. विकासाचे काम करण्यासाठी आणि लोकशाहीसाठी आम्ही एकत्र आलो आहोत. 'इंडिया' च्या माहोलनंतर महाराष्ट्रात पण आमच्या मित्र पक्षांचे सरकार येईल असा विश्वासही चव्हाण यांनी मांडला.

चव्हाण म्हणाले की, आधी इंडिया आघाडीत २६ पक्ष होते. मात्र आता या आघाडीत २८ पक्ष एकत्र आले असून उद्या आघाडीत २८ पक्ष आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NTA च्या ४७ अधिकाऱ्यांची हकालपट्टी, पेपरफुटी प्रकरणानंतर मोदी सरकार ॲक्शन मोडवर

Raigad Health: वीज नसताना मोबाईल टॉर्चच्या उजेडात यशस्वी प्रसूती; जांभूळपाडा आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची धडाडी

Devshayani Ekadashi Celebration: देवशयनी एकादशीला मल्हार हिल विद्यालयात भक्तिरसाचा जल्लोष; रिंगण सोहळ्यात विद्यार्थ्यांनी अनुभवली पंढरीची वारी

Latest Marathi News Live Update : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, धरणसाठयाने गाठली मागील वर्षाची सरासरी

आंदोलनापुढे सरकार झुकलं? NTA मधील बदलांवर आज रात्री मोठी घोषणा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT