विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक चार ऑक्टोबरला? Sakal
महाराष्ट्र बातम्या

विधानसभा अध्यक्षांची निवड नाहीच; काँग्रेसकडून चालढकल?

निवडणुकीची तारीख जाहीर करण्याची राज्यपालांना विनंती

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पत्र, मंत्र्यांच्या शिष्टमंडळाच्या फेऱ्या, काँग्रेस नेत्यांनी साकडे घालूनही या पदासाठी निवडणूक घेण्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मंगळवारपर्यंत राजी झाले नाहीत. त्यामुळे या अधिवेशनातही अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची चिन्हे नसल्याचे स्पष्ट आहे. तरीही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि परिवहन अनिल परब हे मंगळवारी सायंकाळी पुन्हा एकदा राजभवनात जाऊन राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी निवडणुकीची तारीख घोषित करण्याची मागणी केली.

निवडणुकीसाठीचा कार्यक्रम राज्यपालांकडून जाहीर होणे अपेक्षित असतानाही तो झाला नसल्याने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

अधिवेशनात बुधवारी (ता.९)अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारने केली; मात्र पाठविलेल्या पत्रावर राज्यपाल कोश्यारी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर सरकारमधील तिन्ही पक्षाच्या मंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची विनंती केली. तसेच, सोमवारी (ता.७) उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही भेट घेतली. परंतु, या निवडणुकीसाठी राजभवनात कार्यवाही झाली नाही. त्यामुळे या अधिवेशन विधानसभेला अध्यक्ष मिळणार नसल्याचेच दिसत आहे.

काँग्रेसकडून चालढकल?

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्यपालांना अडचणी येत असल्याचे काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे नेते सांगत आहेत. प्रत्यक्षात मात्र, येत्या १० नंतर काँग्रेसचे मंत्री बदलले जाण्याची शक्यता पक्षाच्या गोटातून वर्तविण्यात आल्याने ही निवडणूक पुढे ढकलली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. निवडणूक घेण्याबाबत काँग्रेसमधील काही नेते उत्सुक नसल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT