attack on leader of Swabhimani farmers community Ravikant Tupkar  
महाराष्ट्र बातम्या

Big Breaking: स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न; स्वीय सहायक गंभीर जखमी 

अरुण जैन

बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा स्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यावर सावळा गावातील एका इसमाने कुर्‍हाडीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याचा प्रतिकार करताना श्री. तुपकर यांचे स्वीय सहायकाला छातीत मार लागला असून पोलिसांनी याप्रकरणी हल्लेखोराला अटक केली.

प्राप्त माहितीनुसार रविकांत तुपकर हे सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास चिखली रोड वरील आपल्या जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांशी चर्चा करीत बसलेले होते. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे त्याठिकाणी आले होते. त्यांना सोडण्यासाठी श्री. तुपकर बाहेर आले नेमके याच वेळी सावळा येथील जनार्दन दगडु गाडेकर हा इसम हातात कुर्‍हाड घेऊन श्री. तुपकर यांच्या गाडीचा नंबर लिहीत होता. 

यावेळी तुपकर यांच्या स्वीय सहायकाने तू काय करीत आहे हे विचारताच त्याने त्याच्यावर कुर्हाड उगारले व तुपकर यांना शिवीगाळ केली. श्री तुपकर यांच्याकडेही तो हल्ला करण्यासाठी धावला. त्यावेळी त्यांचे अंगरक्षक व सहायकांनी मधे पडून त्याला थांबवले व पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी याप्रकरणी जनार्धन दगडू गाडेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. पुढील तपास बुलडाणा पोलिस करीत आहेत.

स्वीय सहायक सौरभ पडघान याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे्. विशेष म्हणजे या घटनेतील आरोपी जनार्दन गाडेकर याच्यावर श्री. तुपकर यांच्या शेतातील सोयाबीनची सुडी जाळल्याचाही आरोप आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT