Atul-Bhatkhalkar sakal media
महाराष्ट्र बातम्या

'सोनिया मातोश्रींचे पाय धुता, त्यामुळे राज्याचे प्रश्न कुठे सुटलेत'

भाजप आमदार अतुल भातखळकरांचा शिवसेनेवर घणाघाती टीका

गणेश पिटेकर

मुंबई : भारतीय जनता पक्ष (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्यात नेहमी राजकीय कलगीतुरा रंगलेला दिसत आहे. दोन्ही पक्षांमधील नेते एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी सेना नेते खासदार संजय राऊतांवर टीका केली आहे. तुम्ही रोज मनापासून सोनिया मातोश्रींचे पाय धुता, त्यामुळे राज्याचे प्रश्न तरी कुठे सुटलेत, असा टोला भातखळकर यांनी राऊत यांना लगावला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले होते, की मोदींनी गंगास्नान करुन दलितांचे पाय धुतल्याचे नाट्य घडवले.(Atul Bhatkhalkar Criticize Shiv Sena Leader Sanjay Raut)

या कारणामुळे दलित, मजूर आणि सफाई कामगारांचे प्रश्न उत्तर प्रदेशमध्ये तरी सुटले काय?, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला होता. याला उत्तर भातखळकर यांनी ट्विट करुन दिले आहे. सध्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मिझोराम या पाच राज्यातील निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे राजकीय नेते नैतिकता सोडून टीका करित आहेत. आपण राजकारणाचे वातावरण (Mumbai News) मलिन करित आहोत असा साधा प्रश्नही या मंडळींना पडताना दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT