Sharad Pawar News esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांच्या खाली नव्हे तर बाजूला बसण्याची माझी ताकद; औरंगाबादच्या नेत्याचं मोठं विधान

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबादः राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या विधानानंतर आता राष्ट्रवादी आणि एमआयएममध्ये जुंपली आहे. शरद पवारांच्या खाली नव्हे तर त्यांच्या बाजूला बसण्याची माझी ताकद असल्याचं एमआयएमचे नेते म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांनी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्याबद्दल भाष्य केलं होतं. इम्तियाज जलील धर्मनिरपेक्ष बनले तर त्यांचं पक्षामध्ये स्वागत आहे, असं विधान टोपेंनी केलेलं.

त्यावर इम्तियाज जलील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, मी एमआयएम पक्षातून निवडून येतो म्हणून तुम्ही कट्टरतावादी म्हणता. धर्मनिरपेक्षतेच्या तुमच्या आणि माझ्या व्याख्येमध्ये खूप मोठा फरक आहे.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, तुमचे नेते लोकसभा आणि विधानसभेत जाणार आणि आमच्या पक्षाचे लोक महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये अडकून पडणार, हे चालणार नाही. शरद पवार यांच्या खाली नव्हे तर बाजूला बसण्याची माझी ताकद असल्याचं जलील म्हणाले.

'मी खाली बसेल आणि राजेश टोपे सतरंजीवर बसतील, हे चालणार नाही. ते दिवस आता गेले. तुम्हालाच सतरंज्या उचलायला लावण्याची वेळ आणून दाखवेल' असा इशाराच इम्तियाज जलील यांनी दिला आहे. जलील यांनी थेट शरद पवार यांच्या बाजूला बसण्याची भाषा केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सेक्युलरच्या मुद्द्यावरुन मराठवाड्यामध्ये राष्ट्रवादी आणि एमआयएममध्ये जुंपली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: मोदींच्या फोटोवरून वाद... राज ठाकरे यांनी सोडलं मौन; महापुरुषांच्या रांगेबाबत मोठं वक्तव्य

VAIBHAV SOORYAVANSHI: फिफ्टीपासून फक्त ६ धावा दूर अन् वैभव सूर्यवंशी OUT! दुलीप ट्रॉफी फायनलमध्ये विकेट कशी गमावली?

MSRTC Revenue: एसटीच्या उत्पन्नात ऑगस्टमध्ये मोठी वाढ; नियोजनाचा सकारात्मक परिणाम, अतिरिक्त फेऱ्यांचा लाभ

Marathi News Live Updates : लाखोंच्या अनुदानात अपहार, महिला तलाठ्याला अटक

Kolhapur Drugs: कॉलेज कट्ट्यापासून फार्महाऊसपर्यंत ‘पुड्या’ पोहोच; हायड्रोपोनिक गांजाची एन्ट्री, सोशल मीडियावरून चॅटिंगद्वारे पुरवठ्याची यंत्रणा

SCROLL FOR NEXT