sukanya samriddhi yojana sakal
महाराष्ट्र बातम्या

मुलींसाठी सर्वाधिक व्याज देणारी पोस्टाची भन्नाट योजना! उच्चशिक्षण, विवाहाची मिटेल चिंता; ‘ही’ कागदपत्रे जोडा व‌ २५० रुपये ते दीड लाखांपर्यंत रक्कम गुंतवा

मुलगी जन्मल्यानंतर दहा वर्षांपर्यंत या योजनेंतर्गत खाते उघडण्याची पालकांना मुभा आहे. मुलगी ज्यावेळी १८ वर्षांची होईल, त्यावेळी तिच्या शिक्षणासाठी व विवाहासाठी या योजनेतील पैसे पालकांना दिले जातात.

तात्या लांडगे

सोलापूर : मुलीचे शिक्षण व विवाहाची चिंता दूर करणाऱ्या सुकन्या समृद्धी योजनेत सोलापूर शहर-जिल्ह्यातील तब्बल एक लाख मुलींची खाती काढण्यात आली आहेत. मुलगी जन्मल्यानंतर दहा वर्षांपर्यंत या योजनेंतर्गत खाते उघडण्याची पालकांना मुभा आहे. मुलगी ज्यावेळी १८ वर्षांची होईल, त्यावेळी तिच्या शिक्षणासाठी व विवाहासाठी या योजनेतील पैसे पालकांना दिले जातात.

केंद्र सरकारने जन्मलेल्या मुली १८ वर्षांच्या होतील, त्यावेळी त्यांचा विवाह व शिक्षणाची चिंता पालकांना वाटू नये, मुलींचा बोजा असल्याची त्यांच्यातील भावना कायमची दूर व्हावी म्हणून २०१४ मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. दहा वर्षांत जिल्ह्यातील एक लाखांहून अधिक मुलींचा या योजनेत सहभाग झाला आहे. कोणत्याही टपाल कार्यालयात जाऊन पालकांना सुकन्याचे खाते उघडता येते. पण, पूर्वी मुलीचा जन्माचा दाखला असला तरी खाते उघडता यायचे. आता आधार कार्ड बंधनकारक केले आहे.

दोन मुलींचीच खाते या योजनेतून काढता येते, पण पहिल्या मुलीनंतर दुसऱ्यावेळी दोन जुळ्या मुली झाल्यास त्या तिघींनाही योजनेंतर्गत खाते उघडण्याची सोय आहे. दरम्यान, आता राज्य सरकारने ‘लेक लाडकी’ योजना सुरू केली असून वार्षिक उत्पन्न एक लाखांपर्यंत असलेल्या कुटुंबांतील मुलींना योजनेंतर्गत १८ वर्षे पूर्ण झाल्यावर एक लाखांहून अधिक रक्कम सरकारकडून मिळणार आहे. दुसरीकडे बारावीनंतर आता प्रत्येक मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचेही राज्य सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे आगामी काळात आता पालकांना मुलीच्या शिक्षणाच्या खर्चाची चिंता करण्याची गरज भासणार नाही, अशी सद्य:स्थिती आहे.

योजनेचे खाते उघडण्यासाठी कागदपत्रे

  • - मुलीचा जन्माचा दाखला

  • - मुलीचे आधार कार्ड

  • - पालकाचे (आई किंवा वडील) आधार व पॅनकार्ड

वर्षभरात किती रक्कम गुंतवू शकतो

सुकन्या योजनेअंतर्गत खाते उघडलेल्या पालकासह वर्षात किमान २५० रुपये खात्यात ठेवावे लागतात. जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवण्याची मर्यादा आहे. या योजनेतील खात्यासाठी सर्वाधिक ८.२ टक्के व्याजदर आहे. त्यामुळे लाभार्थीला मुलगी १८ वर्षांची झाल्यावर चांगला परतावा मिळतो. या पार्श्वभूमीवर सुकन्या समृद्धी योजनेतील सोलापूर जिल्ह्यातील खात्यांची संख्या आता एक लाखांवर पोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT