Girish Mahajan  esakal
महाराष्ट्र बातम्या

Girish Mahajan : ''त्यांना चप्पल घ्यायला पैसे राहणार नाहीत...'' गिरीश महाजन एकनाथ खडसेंना नेमकं काय म्हणाले?

पूर्वाश्रमीचे भाजप नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात मागच्या काही दिवसांपासून पुन्हा वाद उफाळला आहे.

संतोष कानडे

मुंबईः पूर्वाश्रमीचे भाजप नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात मागच्या काही दिवसांपासून पुन्हा वाद उफाळला आहे. यावेळी राम मंदिरावरुन दोन्ही नेत्यांमध्ये तूतू-मैंमैं सुरु झाली आहे.

राम मंदिराच्या मुद्द्यावरुन बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, राम मंदिरासाठी मी दोनवेळा कारसेवक म्हणून सहभागी झालो होतो. त्यावेळी आंदोलनामुळे आम्ही ललितपूर जेलमध्येदेखील होतो. मात्र आमच्यासोबत गिरीश महाजन असल्याचं दिसलं नाही. महाजन नेमकं कोणत्या जेलमध्ये होते, हे माहिती नसल्याचं खडसे म्हणाले होते.

एकनाथ खडसे यांच्या आरोपांना गिरीश महाजन यांनी नाशिकमधून जोरदार प्रत्युत्तर दिलं. महाजन म्हणाले की, खडसेंचा मला इलाज करावा लागणार आहे. कारण त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी खडसेंना १३७ कोटी रुपये भरावे लागतील आणि भोसरी जमीन प्रकरणात २७ कोटी रुपये दंड भरावा लागेल. त्यामुळे त्यांना चप्पल घेण्यासाठीसुद्धा पैसे उरणार नाहीत.

महाजन पुढे म्हणाले की, कारसेवा आंदोलनामध्ये आमचे फोटो देशभर गाजले होते. खडसे वेगळ्या जेलमध्ये होते. गुणवंतराव सरोदे, मी आणि वाय.जी. महाजन आम्ही वेगळ्या जेलमध्ये होतो. त्यामुळे खडसेंनी विनाकारण टीका करु नये.

गिरीश महाजन यांच्या जहरी टीकेला एकनाथ खडसे काय उत्तर देतात? हे बघावं लागणार आहे. मागच्या काही दिवसांपासून दोन्ही नेत्यांमध्ये कायम वाद उफाळून येत असल्याचं दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT