Bachhu Kadu deepak kesarkars statement maharashtra politics  
महाराष्ट्र बातम्या

Bachhu Kadu : जरा सबुरीने घ्या...मंत्री दीपक केसरकरांकडून बच्चू कडूंची मनधरणी

सकाळ डिजिटल टीम

भाजपच्या आडोशाला राहून दलाली आणि स्टंटबाजी करणा-या आमदार रवी राणा यांच्याकडूनच खोक्यांचे आरोप माझ्यावर झाले आहेत. सत्तेवर लाथ मारणारा माझ्या सारख्या स्वाभिमानी माणूस असले आरोप सहन करणार नाही.

अशा थेट इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. दरम्यान, मंत्री दीपक केसरकर यांनी बच्चू कडू यांच्यासंदर्भात सूचक वक्तव्य केलं आहे.(Bachhu Kadu deepak kesarkars statement maharashtra politics )

एकिकडे अपक्षांना संधी दिली जाईल असे बोलले जात होते परंतु बंच्चु कडू यांच्यासह कोणत्याही अपक्षाला संधी न मिळाल्याने नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे, राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे. यासर्वांमुळे कडू यांनी अप्रत्यक्षपणे सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांच्या नाराजीवर भाष्य केलं. बच्चू कडू यांनी सबुरीने घ्यावे ते लवकरच मंत्रीपदावर असतील असे सूचक वक्तव्य केसरकर यांनी यावेळी केलं.

केसरकर म्हणाले की, बच्चू कडू हे जेष्ठ नेते असून, त्यांच्याबरोबर दोन आमदार आहेत. अन्य आमदारांच्यावतीने ते बोलत असतील तर, मला त्यातील वस्तुस्थिती माहिती नाही. लवकरच ते मंत्रीपदी दिसतील, अशी आमची अपेक्षा आहे. जे व्यक्ती मंत्री होणार आहेत, त्यांनी थोड संयम ठेवायला हवा, असं केसरकर यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT