Bacchu Kadu esakal
महाराष्ट्र बातम्या

Bacchu Kadu : सध्या धोका देणाऱ्यांचं राज्य आहे; बच्चू कडूंचा नेमका निशाणा कोणावर?

'मुख्यमंत्र्यांनी मंत्रीपदाबाबत दिलेला शब्द पाळणार असल्याचं सांगितलंय.'

सकाळ डिजिटल टीम

'मुख्यमंत्र्यांनी मंत्रीपदाबाबत दिलेला शब्द पाळणार असल्याचं सांगितलंय.'

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार काल पार पडला. यामध्ये 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्यामुळं काही अपक्षांनी नाराजी व्यक्त केलीय. यावर प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी देखील प्रतिक्रिया दिलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीपद देतो म्हणून मला शब्द दिला होता, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिलीय.

आज पुन्हा माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नव्या सरकारवर निशाणा साधलाय. बच्चू कडू म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार सप्टेंबरमध्ये होईल असं मला सांगण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांनी मंत्रीपदाबाबत दिलेला शब्द पाळणार असल्याचंही सांगितलंय. हा मंत्रिमंडळ विस्तार 40 दिवसांनी झाला तर ठिक, अन्यथा पुढच्या अडीच वर्षात होईल, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय. सध्या धोका देणाऱ्यांचं राज्य आहे, असंही ते म्हणाले.

मंत्रीमंडळ विस्तारानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले होते की, 'नाराज आहे असा विषय नाही, प्रत्येकाला वाटतं मी मंत्री बनले पाहिजे. मला मंत्रिपदासाठी थांबवले म्हणजे कायमचं थांबवलं नाही, काही दिवसासाठी थांबवलं आहे... एकत्र राहायचं म्हणजे समजून घ्यावे लागणार. काही अडचणी वरिष्ठांना असतील तर आपण समजदारी घेतली पाहिजे. मला शब्द दिला होता, ते करतो म्हणले होते. मंत्रीपद देतो म्हणून हा शब्द मला दिला होता. हा शब्द जरी पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात पाळला गेला नाही तरी मला विश्वास आहे दुसऱ्या वेळेस जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा मंत्रीपद मिळेल, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२८ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट इतिहासात घडणार दुर्मिळ क्षण? एकाच दिवशी दोन देशात कसे खेळणार भारतीय संघ

Vadodara Mumbai Expressway : महाराष्ट्रातून दिल्ली अन् जयपूर गाठणे होणार सोपे! वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेचा 'हा' मार्ग वाहतुकीसाठी सज्ज; PM मोदींच्या हस्ते उद्घाटन

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

SCROLL FOR NEXT