Balasaheb Thorat  esakal
महाराष्ट्र बातम्या

Balasaheb Thorat: राजीनाम्यानंतर बाळासाहेब थोरात यांना भाजपकडून खुली ऑफर

थोरात यांनी विधानसभेतील गटनेते पदाचा राजीनामा दिला

रुपेश नामदास

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेतील गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. आता थोरातांचं पुढचं पाऊल काय? यासंदर्भात तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

दरम्यान शिंदे गटानंतर आता भाजप प्रवक्ते राम शिंदे यांनी देखील पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे. राम शिंदे शुक्रवारी नगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, केंद्रात व राज्यातही भाजपचे सरकार आहे.

तसेच भाजप हा देशात सर्वात मोठा पक्ष आहे.यामुळे कोणत्याही पक्षातील कोणी नेते दु:खी,किंवा अडचणीत असतील त्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्यांना भाजप आसरा देण्यासाठी तयार आहे.

असं म्हणत राम शिंदे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना खुली ऑफर दिली आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला आहे. काँग्रेसने सत्यजीत तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांना पदवीधर मतदारसंघासाठी एबी फॉर्म दिला होता.

मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्याऐवजी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि ते निवडून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Rules: ग्राहकांना मोठा दिलासा! सिलिंडर वितरण नियमात बदल, बुकिंगमधील अंतर केले कमी

Tigress Captured : युवतीसह शेतकऱ्याला ठार मारणारी वाघीण जेरबंद

Kirit Somaiya : किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी कथित बेकायदेशीर अतिक्रमण; लँड जिहाद चा धक्कादायक प्रकार, आंदोलनाचा दिला इशारा

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विखे पाटलांनी दिली मोठी माहिती

Car Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची अज्ञात वाहनाला धडक; एक ठार, दोघे गंभीर

SCROLL FOR NEXT