Eknath Shinde Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena News : ठाकरेंची ताकद वाढतेय! आज मातोश्रीवर होणार बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश; शिंदे गटाचं टेन्शन वाढणार

रोहित कणसे

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर सर्वच राजकीय पक्षांकडून तयारीला सुरूवात झाली आहे. राज्यत देखील हालचालींना वेग आला असून सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडी या दोन गटात मतदारसंघ आणि उमेदवारांच्या चाचपणी केली जात आहे. यादरम्यान शिवसेना ( उद्धव बाळासाबेब ठाकरे) गटात इन्कमिंग सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे शिंदे गटाचं मात्र टेन्शन वाढताना दिसत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली. यानंतर ठाकरे गटातून मोठी आऊटगोईग सुरू झाली.अनेक आमदार-खासदारांसह नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात दाखल झाले. यानंतर, उद्धव ठाकरे यांनी पुन्हा मैदानात उतरत पक्षउभारणीला सुरूवात केली आहे. यानंतर त्यांना सोडून गेलेले काही माजी आमदार आणि खासदार पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करताना दिसत आहेत.

शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्ष प्रवेश होणार आहे. तसेच वाकचौरे यांच्यासोबत नगर जिल्ह्यातील शेकडो संर्थक देखील ठाकरे गटात सहभागी होणार आहेत. इतकेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अकोला पूर्वचे माजी आमदार हरिदास भदे हे देखील शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठकीनंतर त्यांच्या पक्ष प्रवेशाचा निर्णय होणार आहे.

दरम्यान माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा पक्ष प्रवेश हा नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने महत्वाचा समजला जात आहे. आज (२३ ऑगस्ट) दुपारी १२ वाजता 'मातोश्री'वर हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. इतकेच नाही तर श्रीरामपूरचे काँग्रेसचे शहराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांचाही पक्ष प्रवेश आजच होणार आहे. दरम्यान ठाकरे गटात वाढलेल्या या इन्कमिंगमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं टेन्शन मात्र वाढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT