Navneet Rana Esakal
महाराष्ट्र बातम्या

Navneet Rana: नवनीत राणांच्या उमेदवारीमुळे बच्चू कडू यांना धक्का! महायुतीतून पडणार बाहेर? भूमिकेवर लक्ष

Navneet Rana join BJP: खासदार नवनीत राणा भाजपकडून अमरावती मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. महायुतीचे घटक पक्ष असलेल्या प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना हा धक्का मानला जात आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Navneet Rana join BJP: खासदार नवनीत राणा भाजपकडून अमरावती मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. महायुतीचे घटक पक्ष असलेल्या प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना हा धक्का मानला जात आहे. शिवसेना (शिंदे गट) व भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध डावलत भाजपकडून अमरावतीसाठी नवनीत राणा यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. या उमेदवारीला बच्चू कडूंसह व अमरावती मधील भाजप पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता.

अमरावतीचे आमदार बच्चू कडू यांनी मंगळवारी (ता.२६) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. मात्र त्यांना महायुतीने जुमानले नसल्याची चर्चा आहे. कडू यांनी राणा यांना उभे केल्यास महायुतीतून बाहेर पडू, असा इशारा महायुतीला दिला होता.

भाजपने अमरावतील लोकसभेतून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर राणा यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. दुसरीकडे नवनीत राणा यांच्या प्रवेशानंतर बच्चू कडू नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

नवनीत राणा यांना अमरावतीतून उमेदवारी दिल्यास आम्ही महायुतीतून बाहेर पडू, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला होता. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली होती. राणा दाम्पत्याला पैशांचा माज आहे, अशी घणाघाती टीकाही बच्चू कडू यांनी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT