Uddhav Thackrey Esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackrey: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! संघटनेची इत्यंभूत माहिती असलेला नेता शिंदेंच्या गळाला

राज्यात पक्षांतर मोठ्या प्रमाणावर होताना दिसुन येत आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसुन येत आहेत. अशातच राज्यात पक्षांतर मोठ्या प्रमाणावर होताना दिसुन येत आहे. अशातच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आणि सचिव अनिल देसाई यांचे निकटवर्तीय, आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची संघटना आणि प्रशासकीय कामाची संपूर्ण माहिती असणारे माहीतीगार मारुती साळुंखे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला आहे. मुख्यमंत्र्यांनी हातात भगवा झेंडा देत मारुती साळुंखे यांचं पक्षात स्वागत केलं आहे. मारुती साळुंखे यांच्या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

मारुती साळुंखे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिव आणि खासदार अनिल देसाई यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर गटातील आणि संघटनेची घडी बसवण्याची तसेच प्रत्येकाशी संपर्क ठेवून संघटना तळागाळापर्यंत कशी पोहचवावी याची जबाबदारी मारुती साळुंखे यांच्या खांद्यावर होती.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर संघटनेची नव्यानं बांधणी करण्यासाठी मारुती साळुंखे यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी सलगी करून घेतलेली भूमिका त्यांना पटेना तसेच बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जायचं असेल तर एकनाथ शिंदे यांच्या अधिपत्याखालील शिवसेनेत जाण्यावाचून दुसरा पर्याय नाही, हे त्यांनी ठरवलं आणि त्यानंतर शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मारुती साळुंखे यांनी दिली आहे.

मारुती साळुंखे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून संघटनेची चांगल्या प्रकारे बांधणी करणारा एक मोहरा शिंदे गटाला मिळल्यामुळे त्यांना पक्षवाढीसाठी मोठा उपयोग होणार आहे. काल (रविवारी) पक्षप्रवेशावेळी शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यादेखील उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty House Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारप्रकरणी पुण्यातून पाचजण ताब्यात, गॅंगस्टर बिश्नोई टोळीशी संबंधाचा संशय

Baramati Crime News : बारामतीत चोरटयांनी 25 लाखांचे दागिने केले लंपास; अजित पवार यांच्या अंत्यविधीप्रसंगी चोरटयांचा धुमाकूळ....

Latest Marathi News Union Budget 2026: आज देशात विदेशात कुठं काय घडलं?

Shirur News : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची दोन मुलांसह विहिरीत उडी; शिक्रापूर पोलिसांनी पतीला अटक

Union Budget 2026 : ​'बायोफार्मा शक्ती' उपक्रमासाठी १०,००० कोटींची तरतूद; महाराष्ट्र सरकारच्या मागणीला केंद्राचे बळ : ना. नरहरी झिरवाळ

SCROLL FOR NEXT