अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : ‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे व्हा’ या वाक्याप्रमाणे मराठा समाजातील तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने व्यावसायासाठी मदत केली आहे. महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील एक लाख ८१ हजार ५४० तरुणांना मदत करून व्यवसाय उपलब्ध करून दिला आहे. गेल्या सात वर्षांत महामंडळाने या तरुणांना १,८७४ कोटींचा व्याज परतावा दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली. आमदार नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात महामंडळाची वाटचाल सुरू आहे. महामंडळामुळे मराठा समाजातील तरूण-तरूणांच्या हाताला रोजगार मिळाला. मराठा समाजातील तरूणांना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी बॅंकांकडून कर्ज मिळवून देण्यात महामंडळाची भूमिका निर्णायक आहे. व्याजाची हमी महामंडळ घेत असल्याने बॅंकाही तरूणांना कर्ज स्वरूपात अर्थसाहाय्य करतात. २०१८ पासून मराठा समाजातील पावणेदोन लाखांहून अधिक तरूणांना स्वत:च्या पायावर उभे करण्यात महामंडळाने हातभार लावला आहे.
शेतीपूरक व्यवसाय, अन्न व्यवसाय, उत्पादन, सेवा, व्यापार क्षेत्रातही तरूणांनी पाऊल टाकले आहे. स्वत:चा व्यवसाय सुरू केलेल्या या तरुणांच्या माध्यमातून २५ हजारांहून अधिक इतर तरूणांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे. दरम्यान, राज्य सरकारने महामंडळाला चालू आर्थिक वर्षात ४५० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आणखी ३०० कोटींची महामंडळाची मागणी आहे. शाळा सोडल्याचा दाखला (हिंदु मराठा नोंद असलेला) किंवा ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र असलेल्या तरूणांना महामंडळाकडून ‘एलवाय’ दिला जातो. त्याआधारे संबंधित तरुण-तरूणींना बॅंकेकडून व्यवसायासाठी अर्थसाहाय्य दिले जाते, अशी माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
तरूणांनी उभारलेले व्यवसाय
शेतीपूरक व्यवसाय
१,०१,५८९
अन्न व्यवसाय
४,८७३
उत्पादन क्षेत्र
४,८१६
सेवा उद्योग
५२,३३९
व्यापार
१७,४५९
इतर
३३८
महामंडळाकडून १२ टक्के व्याज परतावा
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे अर्थसहाय्य मागणीचा अर्ज केल्यानंतर त्या पात्र तरुणांना महामंडळाकडून ‘एलवाय’ दिला जातो. त्यानंतर तो तरुण बॅंकेकडे कर्जासाठी अर्ज करतो. बॅंकेकडून कर्ज मिळाल्यानंतर त्याची माहिती महामंडळाला दिली जाते. त्यानंतर संबंधित तरूणास महामंडळाकडून त्या कर्जाच्या हप्त्यावेळी व्याज परताव्याची रक्कम (१२ टक्क्यांप्रमाणे) दिली जाते. सात वर्षे १५ लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर हा व्याज परतावा महामंडळाकडून दिला जातो. बॅंकांचा व्याजदर शक्यतो तेवढाच असल्याने तरूणांना स्वत:हून कर्जावरील व्याज भरावे लागत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.